इंदापूर : शेतकरी संघटनेचे आंदोलन पाठीमागे

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरू होते.
शेतकरी संघटनेचे आंदोलन पाठीमागे
शेतकरी संघटनेचे आंदोलन पाठीमागेsakal
Updated on

वालचंदनगर, भवानीनगर (ता.इंदापूर) : येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोर सुरु आलेले शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन आज गुरुवार(ता. ४) रोजी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.

गेल्या गळीत हंगामामध्ये सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याला करार करुन दिलेल्या दराप्रमाणे छत्रपती कारखान्याच्या सभासदांनाही २८०८ रुपये प्रतिटन उसाचा दर द्यावा. तसेच उत्तरप्रदेश राज्याच्या धर्तीवर चालू गळीत हंगामामध्ये १० रिकव्हरीला ३५०० रुपये प्रतिटन दर मिळावा या मागण्यासाठी भवानीनगर येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरू होते.

शेतकरी संघटनेचे आंदोलन पाठीमागे
पुणे : मुंढव्यातील गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण

आज गुरवार (ता. ४) रोजी आंदोलनाचा चाैथा दिवस होता. दुपारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखान्याचे प्रशांत काटे , कारखान्याचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. शेतकरी संघटनेच्या उस दराबाबतच्या मागण्यांचा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. यासंदर्भात लेखी पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी शेतकरी संघटनेला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदखिले , पांडुरंग रायते , सतीश काटे , राहुल काळे , हनुमंत वीर, संजय सोनवणे राजाराम रायते उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बैलगाडीमधून मिरवणूक काढून शेतकरी संघटनेचा विजय असल्याची घोषणाबाजी केली . खर्डा- भाकरी खाऊन आंदोलनाची सांगता केली.

शेतकरी संघटनेचे आंदोलन पाठीमागे
नागपूर : मदतीसाठी जुन्याच निकषांचा आधार; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की,छत्रपती कारखान्याचे दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने सुरु आहे. चालू गळीत हंगामामध्ये १२ लाख मेट्रीक टन उस गाळप करण्याचे उद्ष्ठि आहे.सर्व सभासदांचे वेळेमध्ये गाळप होणार असून सभासदांनी सहकार्य करुन सर्व उस कारखान्याला देण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com