esakal | इंदापूर : गुन्हेगारी मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य
sakal

बोलून बातमी शोधा

police

इंदापूर : गुन्हेगारी मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत इंदापूर शहर व ग्रामीण मधील गुन्हेगारांची कुंडली तयार असून शहर व ग्रामीण भाग गुन्हेगारी मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक सहकार्य करावे असे आवाहन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी केले.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने येथील शहा सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित तक्रार निवारण दिन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, नगराध्यक्षा अंकिता शहा उपस्थित होते.

हेही वाचा: "कोविड-१९ बिमारी और इलाज" या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर म्हणाले, पोलीस ठाण्याअंतर्गत नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही पोलीसांची जबाबदारीअसून रोज गस्तीसाठी पाच गाड्या फिरत आहेत. तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गुन्ह्या नुसार वर्गवारी करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. किशोरवयीन मुलामुलींचे तसेच महिलांच्या काही विषयावर समुपदेशन केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल .गणेशोत्सव काळासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. नायब तहसीलदार अनिल ठोंबरे म्हणाले, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान वाढीसाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना राष्ट्रीय मतदार दिनी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, सण व उत्सव ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून उत्सवामध्ये कोरोना शासकीय निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: छगन भुजबळ निर्दोष मुक्तता : अंजली दमानीयांचं आव्हान!

यावेळी माजी नगरसेवक प्रशांतशिताप,महिला दक्षता समितीच्या सदस्या सायराआतार,सीमा कल्याणकर,नगरसेवक अनिकेत वाघ,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,नागनाथ पाटील, ज्ञानेश्वर धनवे, दीपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महिला दक्षता समिती सदस्य बकुळा शेंडे,महिला दक्षता समितीच्या पोलीस हवालदार माधुरी लडकत, पोलीस हवालदार प्रवीण भोईटे, अमोल खैरे, धरमचंद लोढा, हमीद आतार, बाळासाहेब क्षीरसागर,पोलीस कर्मचारी ,पोलीस पाटील उपस्थित होते.

loading image
go to top