esakal | "कोरोना विषाणू कोविड-१९ बिमारी और इलाज" या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

koshyari

"कोविड-१९ बिमारी और इलाज" या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे : येथील स्थानिक रहिवाशी दिव्यांगमित्र, सर्पमित्र तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा आयुक्त भरत जोशी यांनी कोरोना सारख्या ज्वलंत विषयावर अंधबांधवासाठी लिहिलेल्या "कोरोना विषाणू कोविड-१९ बिमारी और इलाज" या हिंदी भाषिक ब्रेल लिपीतील २१ व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजभवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच पार पडला.

या ब्रेल लिपीतील पुस्तकात कोविड १९ ची शास्त्रीय माहिती, लक्षणे, कोरोनाचा फैलाव कसा होतो आणि तो कसा कमी करावा. तसेच नियमित व्यायाम, लसीकरण, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझेशन यावर सविस्तर माहिती दिलेली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी दिव्यांगमित्र ब्रेल पुस्तकाचे लेखक भरत जोशी यांचे कौतुक केले आणि या त्यांच्या अव्दितीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या ब्रेललिपी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात दिव्यांगाचा आणि दिव्यांगाना मदत करणाऱ्या १० डोळस व्यक्तींचा भेटवस्तू आणि सेवाव्रती सन्मानपत्र राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. भरत जोशी हे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा आयुक्त असल्याने स्काऊटचा उद्देश अपंग-अंध यांची सेवा करणे हा आहे. या सामाजिक जाणिवेतून त्यांनी आतापर्यंत २१ ब्रेल पुस्तकांची निर्मिती केली. ही पुस्तके देशातील राज्यातील १०० अंध शाळांना विनामूल्य पाठविण्यात आली आहेत.

हेही वाचा: रत्नागिरीत 300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 155 तडीपार

अंधव्यक्तींसाठी कार्य करत असताना वेगवेगळे उपक्रम देखील जोशींनी राबविले आहेत. या दिव्यांग व अंध व्यक्तींना भारतीय नौदल सप्ताहात लायन गेटमधुन नेव्हल डॉकमध्ये नेऊन आणले, लढाऊ बोटी दाखवून लढाऊ बोटीत दिव्यांगांच्या सुरेल गाण्यांचा कार्यक्रम केला, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाला शैक्षणिक भेट दिली. अलिबाग, हर्णे, माथेरान, महाबळेश्वर येथे ४ दिवसाचे अंध विद्यार्थ्यांच्या वाद्यवृंदासह व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित केले होते, त्यानां राणीच्या बागेत देखील नेऊन पक्षी, प्राणी, वनस्पती, निसर्ग, वने, पर्यावरण माहितीसह १ दिवसाची शैक्षणिक भेट दिली.

तसेच दुसरी शैक्षणिक भेट म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) मध्ये जंगल भ्रमंती, टायगर सफारी, लायन सफारी, कान्हेरी केव्हज आणि तेथे प्रस्तरा रोहणाचे, रॉक क्लायंबिंगचे मूळ प्रशिक्षण आणि पार्कमध्ये सांघिक खेळ आदी उपक्रम भरत जोशी दिव्यांगासाठी राबवत असतात. त्यात हा पुस्तकांचा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी हाती घेतला. अंध व दिव्यांग व्यक्तींना जनमानसातील पुस्तके वाचता येण कठीण आहे. त्यासाठी त्यांनी ब्रेललिपीचा वापर करून त्यांच्यासाठी पुस्तके प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून ही पुस्तके वाचून डोळस माणसांप्रमाणे त्यांना देखील ज्ञान प्राप्त होऊ शकते.

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड मुंबई यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्था असते. या नॅबमधून अंधांचा विकास केला जातो. अंधांसाठी आपण डोळस म्हणून काम करत असतो. परंतु हे त्यांना कळणं गरजेचं आहे. अंधांसाठी पुस्तक लिहिण्याची प्रेरणा ही त्या अमरावतीमध्ये शेतात काम करणाऱ्या अंध शेतकऱ्यामुळे आली. अमरावतीमध्ये गेलो असता तिथे माझी सर्पांबद्दल माहितीची पुस्तके येणार होती.

त्यावेळी मी त्यांच्याशी मार्गाबद्दल विचारपूस केली असता तो शेतकरी अंध असल्याचे कळले. आणि त्यावेळी माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की शेतात काम करताना यांना सर्पदंश झाला तर काय होईल तेंव्हा या अंधव्यक्तिंना सर्प चावल्यानंतर करावयाचे प्राथमिक उपचार आणि प्रत्येक सर्पांची माहिती यासंदर्भात त्यांना समजेल या भाषेत म्हणजेच ब्रेल लिपीमध्ये पुस्तकं लिहीण गरजेचं आहे. आणि तेंव्हापासूनच अंधव्यक्तीं साठी पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली आणि सर्पस्पर्श हे पाहिलं पुस्तक १९८५ साली मी लिहिलं. जेणेकरून सर्प चावल्यावर काय प्राथमिक उपचार करायचे याच्यावर ते पुस्तक लिहिले आहे. यापुढे अंधांसाठी अतिशय जीवनावश्यक अश्या गोष्टींवर माझं पुस्तक लिहिण्याचं काम चालूच राहणार आहे. अंधांना स्वावलंबी करण्यासाठी नॅब व अंधशाळांमधून त्यांना त्याप्रकारचे शिक्षण दिले जाते. हर्णे हे माझं गाव असून मला हर्णे मध्ये २० वर्ष झाली आणि हे कार्य मी गेली १५ वर्ष करत आहे. वरळीतील नॅबमध्ये मी ही लिपी शिकलो.

तेथे ज्या घरात अंध व्यक्ती असेल त्यांना कस सांभाळायचं त्यांना कस हाताळायच, त्यांच्याशी कस वागायचं याच शिक्षण दिल जात. भुतानमधील अंध शाळेला देखील भेट दिली आहे. तेथील अंधांना जागतिक स्तरावर अंधांची काय परिस्थिती आहे याचं देखील शिक्षण दिल जात. तसेच जपानमध्ये जागतिक आनंद मेळावा होता तर त्यावेळी तेथे त्सुनामी या पुस्तकाच प्रकाशन तेथील राजदूताकडून करण्यात आलं आणि तिथल्या शाळांना व अंधव्यक्तिंना ते पुस्तक भेट दिल. आणि ती पुस्तके आपण जपान मध्ये विनामूल्य वाटावयास दिली होती. अजून यापुढेही अंध व्यक्तींसाठी भरपूर विषयांवर पुस्तके लिहिण्याचा मांनस आहे; असे भरत जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा: नारायण राणेंच्या पत्नी, मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जाहीर

जोशी यांनी प्रकाशित केलेली पुस्तके

अंधव्यक्तींसाठी ब्रेल लिपीमध्ये

१) सर्पस्पर्श-यदि किसी अंधव्यक्तिको साप काट ले तो प्रथमोपचार कैसे करे, २) आपत्कालीन व्यवस्थापन, ३) त्सुनामी, ४) पर्यावरण , ५) जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन, ६) योगस्पर्श, ७) भारत देशका राष्ट्रध्वज, ८) स्वावलंबी अंधमित्र, ९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १०) श्री. स्वामी स्वरूपानंद, ११) भारत के अंधोके लिये दिपावली विशेषांक, १२) मनाचे श्लोक, १३) निसर्ग, १४) अष्टविनायक, १५) दिव्यांग, १६) दिव्यांगांच्या कथा आणि व्यथा, १७) दिव्यांगांसाठी सुविधा, १८) दिव्यांगांसाठी लघुउद्योग, १९) सक्षम दिव्यांग, २०) कोरोना विषाणू कोविड-१९ आजार आणि उपाययोजना (मराठी भाषा) आणि २१ ) कोरोना विषाणू कोविड -१९ बिमारी उपाययोजना ( हिन्दी भाषा) अशा २१ पुस्तकांचे प्रकाशन जोशी यांनी केले आहे.

loading image
go to top