esakal | इंदापूर : घरोघरी शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

school

इंदापूर : घरोघरी शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

रेडणी ( ता. इंदापूर ) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुप्रिया आगवणे व मुख्याध्यापिका अनिता जाधव यांनी कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकांच्या सहकार्याने घरोघरी शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची दखल घेत गटविकास अधिकारी विजयकुमार परिट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी या फिरत्या नावीन्यपूर्व शाळेस भेट देवून शिक्षक व पालकांचे कौतुक केले.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्ष भरापासून जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा बंद आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यावर्षी सुद्धा शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी इंदापूर पंचायत समिती अंतर्गत रेडणी येथील उपक्रम लक्षवेधी ठरला आहे.

या उपक्रमा अंतर्गत दोन्ही शिक्षक पालकांना स्वयंसेवक म्हणून बरोबर घेवून त्यांच्या मुलांना शिकवतात. गावातील गल्लीतील सर्व विद्यार्थी पालकांच्या घरात शाळा म्हणून एकत्र येतात . पालकांच्या घरी भिंतीवर शैक्षणिक तक्ते चिटकवण्यात येतात. येथे मुले एकत्र येऊन अभ्यास करतात. मुलांचे पालक स्वयंसेवक म्हणून मुलांच्या अध्यापनामध्ये मदत करतात. तर केंद्रप्रमुख भिवा हगारे, दिलीप बोरकर हे शिक्षकांना मार्गदर्शन करतात.

हेही वाचा: परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

यावेळी इयत्ता दुसरीची अनुष्का भोसले व स्वराली लोंढे यांनी अस्खलितपणे शब्द व इंग्रजी अंक प्रकट वाचन करून दाखवताच गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी अनुष्का व स्वराली सोबत सेल्फी काढून त्यांना खाऊचे पैसे देऊन कौतुककेले .आपणास शाळा की घरात अभ्यास करण्यास आवडते या विजयकुमार परीट यांच्या प्रश्नावर हसत हसत अनुष्काने शाळा खूप आवडते असे उत्तर देवून शाळेची ओढ प्रकट केली. लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली.

loading image
go to top