esakal | इंदापूर मूकबधिर शाळा 'माझी वसुंधरा' अभियानात सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर मूकबधिर शाळा 'माझी वसुंधरा' अभियानात सहभागी

इंदापूर मूकबधिर शाळा 'माझी वसुंधरा' अभियानात सहभागी

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर येथील समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधिर निवासी शाळेच्या मूकबधिर विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती मूर्ती तयार करून, त्यांनी नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका निशा चकोर यांचे मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा: Pimpri : भटक्या कुत्र्यांनी फोडली पार्किंगमधील चारचाकी

सदर विद्यार्थ्यांना इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांचे पती तथा इंदापूर तालुकाशिक्षणप्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनीशाळेतजावून प्रमाणपत्र देवून त्यांचा कौतुक सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत गणपती ही विद्येची देवता म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पर्यावरण पूरक गणपतीचा वापर करून जलप्रदूषण टाळणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी देश, राज्य, इंदापूर शहर कोरोनामुक्त होऊ दे. असे विघ्नहर्त्या श्री गणेशास साकडे घातले.

यावेळी समीर कचरे, ऋषिकेश जाधव, करण चोरमले, अर्जुन चोरमले, कुणाल शिंदे, पृथ्वीराज शिंदे या विद्यार्थ्यांनी गणपती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सुत्रसंचालन शाळेतील वरिष्ठ विशेष शिक्षक तुकाराम डुकरे यांनी केले. यावेळी अल्ताप पठाण यांच्यासह मुकबधीर शाळेतील शिक्षक व कर्मचारी या उपस्थित होते.

loading image
go to top