धक्कादायक : इंदापुरात पीपीई किट टाकले जातायेत रस्त्यावर

डॉ. संदेश शहा
Wednesday, 19 August 2020

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सरकारी मळ्याच्या संरक्षक भिंतीजवळ कोरोना महा मारीत वापरण्यात आलेले पीपीई किट व इतर वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

इंदापूर (पुणे) ः पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सरकारी मळ्याच्या संरक्षक भिंतीजवळ कोरोना महा मारीत वापरण्यात आलेले पीपीई किट व इतर वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयाच्या पटांगणात सर्वांना प्रवेश बंद आहे. शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे रोज सकाळी अनेक नागरिक महामार्गावर फिरायला जातात.

 

धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही, मग आम्ही जमिनी का द्यायच्या? शेतकऱ्यांचा शासनाला...

१९ ऑगस्ट रोजी व्यायामा करण्यासाठी जाणा-या जागरूक लोकांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्याच्या अलिकडे सर्विस रस्त्यासलागून सरकारी मळ्याची संरक्षक भिंत आहे. सर्विस रोडपासून पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पीपीई कीट व इतर वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. महामार्गावरून चार चाकी, दुचाकी व अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते.

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

सकाळी व संध्याकाळी पायी चालण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. कोरोनाग्रस्तांजवळ जाण्याची, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची तसेच वेळ प्रसंगी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्याची मुभा शासन यंत्रणा कोणाला देत नाही. त्या पार्श्वभूमीवर कोरोना कचरा उघड्यावर टाकला जाणे म्हणजे सर्वांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती व संतापाची भावना निर्माण झाली आहे. ज्या माणसाने बेजबाबदारपणे हे किट उघड्यावर टाकले, त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच भविष्यात असे प्रकार होवू नयेत म्हणून कडक उपाययोजना होणे गरजेचे आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 दरम्यान, यासंदर्भात इंदापूर कोविड केअर सेंटर तसेच शासकीय उपजिल्हा रूग्णालय व विलगीकरण कक्षाच्या सूत्रांना विचारणा केली असता, वापरात आलेले पीपीई कीट व इतर वैद्यकीय कचरा सर्व खबरदारी घेवून नियमितपणे जाळून टाकला जातो असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा धोकादायक वैद्यकीय कचरा कोणी टाकला यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Indapur, PPE kits are thrown on the road