विहिरीमध्ये बुडून बहीण-भावाचा मृत्यू 

राजकुमार थोरात
Saturday, 30 May 2020

इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील विहिरीमध्ये पाण्यात पाय घसरुन पडल्याने दोन चिमुरड्या बहीण- भावाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

वालचंदनगर (पुणे्) : इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील विहिरीमध्ये पाण्यात पाय घसरुन पडल्याने दोन चिमुरड्या बहीण- भावाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

रेल्वेचे आरक्षित तिकीट देतो सांगून मजुरांची फसवणूक करणाऱ्यास अटक

या घटनेमध्ये सार्थक संजय वाघमोडे (वय- 3 वर्षे) व अनुष्का संजय वाघमोडे (वय - दीड एक वर्षे सहा महिने) या बहिण-भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलांचे वडिल संजय गंगाराम वाघमोडे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 30) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मालन संजय वाघमोडे या घराजवळील विहिरीमध्ये पिण्याचे पाणी आण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे सार्थक व अनुष्का हे दोघे बहिन- भाऊ विहिरीमध्ये उतरले. दोघांचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबतचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश माने करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indapur- Sister and brother drown in well