esakal | Indapur: सुहास शेळके यांच्या वर निलंबनासाठी तहसीलदारांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

सुहास शेळके यांच्या वर निलंबनासाठी तहसीलदारांना निवेदन.

इंदापूर : सुहास शेळके यांच्या वर निलंबनासाठी तहसीलदारांना निवेदन

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू असून उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुहास शेळके हे शासकिय नियमांचे उल्लंघन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचारार्थ मदत करत आहेत.

डाॅ.शेळके यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी इंदापूर शहर भाजपच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांना करण्यात आली. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्रीकांत पाटील यांना हे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: बेळगाव : 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात

तर लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे म्हणून स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांना सहभागी करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाबरोबरच भाजपच्या नगरसेवकांना देखील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आपण विचारणा केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा आरोप वस्तुनिष्ठ नाही असे डॉ. शेळके यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: बेळगाव : 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात

इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.८ ते १९ ऑक्टोबर कालावधीत शहरात नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू असून सोशल मिडिया, जाहिरातीच्या माध्यमा तून याची प्रसिध्दी सुरू आहे. यासाठी लस पुरवठा हा उपजिल्हा रूग्णालयाच्यामाध्यमातून देण्यात येत आहे. वास्तविक गत दीड वर्षा मध्ये इंदापूर नगरपरिषदेने कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तत्कालीन प्रांता- धिकारी दादासाहेब कांबळे यांनी देखील केले आहे.

यानिमित्त शहरात लसीकरण मोहिम राबवण्यासाठी नगरपरिषद सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र यास केराची टोपली दाखवूनडॉ. शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी भाजपची मागणी असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

शहर भाजपचे अध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी दिला. यावेळी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे,नगरपरिषद गट नेते नगरसेवक कैलास कदम, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक गोरख शिंदे व सुनील आरगडे, जावेद शेख,सागर अरगडे, अभिजित अवघडे, संदीप चव्हाण, असलम शेख, आबासाहेब थोरात, अक्षय राऊत, विकी खुडे,अशोक व्यवहारे उपस्थित होते.

loading image
go to top