इंदापूर - सुप्रियाताईच्या सहभागामुळे नागपंचमीचा कार्यक्रम लक्षवेधी

डॉ. संदेश शहा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

इंदापूर - सराटी (इंदापूर) येथे भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच नागपंचमी निमित्त आयोजित महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी सक्रीय सहभाग घेवून आनंद लुटल्याने कार्यक्रमाची गोडी वाढली. सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकाराने विद्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाचा लाभ हजारो महिलांनी घेतला. विशेष म्हणजे सर्व कार्यक्रम विद्यार्थी, पालक व कुटुंबियाना पहाण्यासाठी विशेष स्टेडीयम उभारण्यात आल्याने हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमास जोडूनच श्री. 

जगदाळे यांनी विविध पाळणे, खाद्ययात्रा भरविल्याने कार्यक्रमास आनंद मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, मंगलसिध्दी दुध संघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र तांबिले, जिल्हापरिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य 
प्रदिप जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस पोतराज, गारूडी, वाघ्या मुरळी, वासुदेव, बोहारीण बाई, हाताच्या खुणांनी नाव सांगणे आदी कार्यक्रम झाल्यानंतर महिलांचे कार्यक्रम सुरू झाले. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, तालुकाध्यक्षा रेहाना मुलाणी, जिल्हा बॅंकेच्या संचालिका वर्षा शिवले, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सविता व्होरा आदी हिरकणी मैदानात उतरल्या. 

सुरवातीस सौ. सुळे यांनी वैशाली नागवडे यांच्यासमवेत फुगड्या खेळल्या. त्यानंतर त्यांनी झोक्याचा आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी नागपंचमीच्या गाण्यांचा आनंद लुटत फेर धरला तसेच झिम्मा फुगड्यांचा आनंद लुटला.खासदार असून सुध्दा सौ. सुळे यांनी देहभान विसरून या कार्यक्रमात भाग घेतल्याने उ पस्थित विद्यार्थिनी, महिलांनी एकच जल्लोष केला. त्यातच अधूनमधून रिमजीम पाऊस पडल्याने या कार्यक्रमाची रंगत वाढली. 

नागपंचमीचे कार्यक्रम सर्वत्र होतात. मात्र आप्पासाहेब जगदाळे यांनी भारतीय संस्कृती व मातीशी इमान राखणारा कार्यक्रम ठेवून लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे कौतुकोदगार खासदार सौ. सुळे यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यास साथ दिली. हालगी, संभलच्या तालावर सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाची गोडी त्यामुळे 
उत्तरोत्तर वाढत गेली.

Web Title: Indapur - Supriyatai's participation in Nagapanchami's program