इंदापूर तालुक्यातील ५९ अंगणवाडीसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचा निधी

राजकुमार थोरात
शनिवार, 31 मार्च 2018

निधी मंजूर करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांचे सहकार्य मिळाले. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अामदार दत्तात्रेय भरणे यांच्या सहकार्याने तालुक्यामध्ये जास्तीजास्त विकासकामे करण्याचे काम सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील १० अंगणवाडीच्या इमारतींच्या बांधकामांसाठी व ४९ अंगणवाडीच्या दुरुस्ती व शौचालयासाठी १ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आराेग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शाळेमध्ये , झाडाखाली शिक्षणाचे धडे गिरवावे लागत होते. तसेच अनेक अंगणवाडीच्या परीसरामध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. इमारतींची पडझड झाली असल्याने तालुक्यातील ४९ अंगणवाड्यासाठी प्रत्येकी १ लाख रुपये मंजूर झाले अाहेत. तसेच १० अंगणवाड्यांना नवीन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी ६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

निधी मंजूर करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांचे सहकार्य मिळाले. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अामदार दत्तात्रेय भरणे यांच्या सहकार्याने तालुक्यामध्ये जास्तीजास्त विकासकामे करण्याचे काम सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.

६ लाख रुपये मंजूर झालेल्या अंगणवाड्यांची व गावांची नावे : काळेवस्ती (रेडणी), डाळज नंबर - १,पिंपळाचा मळा (रुई), माळेवाडी (पळसदेव), बोराटेवस्ती (न्हावी), काळेवस्ती (बिजवडी), मल्हारवाडी ( बोरी), अर्जुनवस्ती (कळंब), उद्धट व भोडणी
 
शौचालय व दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर झालेल्या अंगणवाडी व गावांची नावे : वनगळी (बिजवडी), थोरातवाडी (लोणीदेवकर), कांदलगाव, माळवाडी, बेंदेवस्ती (माळवाडी), चिद्यादेवी, खामगळवाडी (पिंपरी  खुर्द), अजोती, विठ्ठलवाडी (गलांडवाडी), राऊतवाडी (पंधारवाडी), राखुंडेमळा ( बाभुळगाव) , जाणाईमळा (निमगाव-केतकी), निमगाव केतकी गावठाण, हेगडेवस्ती व पाटीलवस्ती ( वरकुटे खुर्द), बुनगेवस्ती (तरंगवाडी), साखरेवस्ती (खोरोची), बोराटवाडी ,गोराईमळा (शेळगाव), नलवडेवस्ती व पाटीलवस्ती ( गोतोंडी), सराफवाडी, चव्हाणवस्ती (टण्णू), नरसिंहपूर, बावडा गावठाण, खंडोबानगर, आरगडेवस्ती (बावडा), टकलेवस्ती ,लासुर्णे गावठाण (लासुर्णे),भोईटेमळा (सणसर),पवारवाडी, पोधंवडी गावठाण (पोधंवडी), मदनवाडी, वायसेवाडी (अकाेले), भाग्यनगर,भगतवस्ती, भोईटेवस्ती (सणसर तरंगवाडी, पवारवाडी गावठाण, मोरेवस्ती (पवारवाडी), मानकरवाडी, घोळवेवस्ती ( निंबोडी), बेलवाडी, लालपुरी, वीरवस्‍ती (कळंब), रासकरमळा (दगडवाडी), वाघमोडेवस्ती (बोरी ), रानमळा (काझड) आणि रुई.

Web Title: Indapur Tehsil 59 Child Home Donation of 1 Crore 9 Lakh