मराठा आरक्षणासाठी बेमुदत चक्री उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्‍तालयासमोर सोमवारपासून बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान, ‘महाराष्ट्र बंद’च्या कालावधीत घडलेल्या हिंसक घटनांनंतर आंदोलनाची आचारसंहिता निश्‍चित करण्यात आली आहे. यापुढे संयम, शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू राहील, असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात ५८ मूक मोर्चे काढले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, समाजाच्या मागण्यांकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे. राज्य सरकारने नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. तसेच, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्‍के सवलत, वसतिगृह, शेतमालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला; परंतु सक्षमपणे अंमलबजावणी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, विकास पासलकर, तुषार काकडे, रघुनाथ चित्रे-पाटील, हणमंत मोटे, किशोर मोटे, मुकेश यादव, सुशील पवार, माधव बारणे, अरुण वाघमारे, बाळासाहेब आमराळे, विराज तावरे, संजयसिंह शिरोळे, तानाजी शिरोळे यांच्यासह शहर-जिल्ह्यातून आंदोलक सहभागी झाले आहेत. 

आंदोलनाची आचारसंहिता 
‘महाराष्ट्र बंद’च्या कालावधीत काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले. त्यामुळे लक्ष विचलित झाल्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. ते होऊ नये, यासाठी आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे, अशी माहिती शांताराम कुंजीर यांनी दिली.

Web Title: Indefinite hunger strike For Maratha Reservation