नगर

नगर
Published on

स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिसांना पदके जाहीर

जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकारी, अंमलदारांचा समावेश; आज होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. १४ ः स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कर्तृत्ववान पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे. जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकारी व अंमलदारांना विविध पदकांनी गौरविण्यात येणार आहे.

भारत सरकारकडून देशातील पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक, २५ वर्षांच्या सेवा कालावधीसाठी दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि १५ वर्षांच्या सेवा कालावधीसाठी उत्कृष्ट सेवा पदक, अशा तीन प्रकारची पदके प्रदान करण्यात येतात. जिल्हा पोलिस दलातील ३० जणांचा या पदकांनी गौरव होणार आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक ः पोलिस उपनिरीक्षक संपत खैरे (सुपे पोलिस ठाणे), पोलिस उपनिरीक्षक शैलेश उपासने, सहायक पोलिस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यद (पोलिस मुख्यालय).

अतिउत्कृष्ट सेवा पदक (२५ वर्षे सेवा) ः सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात (एमआयडीसी), पोलिस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ (वाचक शाखा), सहायक पोलिस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यद (पोलिस मुख्यालय), सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय खंडागळे (पोलिस मुख्यालय), सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे (बिनतारी संदेश दळणवळण).

उत्कृष्ट सेवा पदक (१५ वर्षे सेवा पूर्ण) ः पोलिस उपनिरीक्षक किरण शेलार (शिर्डी), सहायक पोलिस उपनिरीक्षक किरण शेलुकर (वाचक शाखा १), पोलिस हवालदार सचिन पवार (वाचक शाखा १), पोलिस हवालदार रेहान शेख (वाचक शाखा), पोलिस हवालदार कृष्णा कुऱ्हे (शिर्डी), पोलिस हवालदार दिगंबर कारखिले (आर्थिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार रंगनाथ नरसाळे (मोटार परिवहन विभाग), पोलिस हवालदार मल्लिकार्जुन बनकर (आर्थिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार कृष्णा विधाटे (जिल्हा विशेष शाखा), पोलिस हवालदार राजू सुद्रिक (एमआयडीसी), पोलिस हवालदार संदीप पवार (एमआयडीसी), पोलिस हवालदार संतोष ओहोळ, पोलिस हवालदार सचिन जाधव, पोलिस हवालदार दीपक घाटकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार अभिजित अरकल (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार सुयोग सुपेकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार सुरेश माळी (वाचक शाखा २), पोलिस हवालदार माधुरी तोडमल (वाचक शाखा), पोलिस हवालदार कीर्ती कांजवणे (वाचक शाखा), पोलिस हवालदार भाग्यश्री भिटे (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार राहुल सोळुंके (जिल्हा विशेष शाखा), पोलिस हवालदार अमोल घुले (वाचक शाखा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com