पुण्यात स्वतंत्र 'सायबर पोलिस ठाणे' कार्यान्वित 

pune.jpg
pune.jpg

पुणे : आत्तापर्यंत पुणे पोलिसांची 'सायबर गुन्हे शाखा' अशी ओळख असणारा विभाग स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे म्हणून मंगळवारपासून काम करण्यास सुरूवात झाली. स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यामुळे नागरीकांची होणारी फरफट थांबण्याबरोबरच गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. सायबर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या पहिल्या तक्रारीची प्रत पोलिस आयुक्तांनी तक्रारदाराकडे देत सायबर पोलिस ठाण्याच्या कामास प्रारंभ झाला. 

पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी स्वतंत्र 'सायबर पोलिस ठाणे'चे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर पहिल्या तक्रारीची प्रत तक्रारदाराकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, साहेबराव पाटील, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यावेळी उपस्थित होते. 

राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्‍वभुमीवर काही वर्षांपासून राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्हा व शहरामध्ये सायबर पोलिस ठाणे निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी मागील वर्षी पोलिस आयुक्तालयामध्ये असलेले सायबर गुन्हे शाखेचे कार्यालय शिवाजीनगर मुख्यालयातील स्वतंत्र इमारतीमध्ये हलविले होते. त्यानंतर वर्षभर स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मंगळवारी सायबर गुन्हे शाखेसाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले. 

सायबर पोलिस ठाणे' झाल्याने होणारे फायदे 
-  सर्व सायबर गुन्हे एकत्रीत होण्यास मदत 
- सायबर गुन्ह्यांच्या तपासाला मिळणार गती 
- फसवणुक होणाऱ्या नागरीकांना पोलिस ठाण्यांचे उंबरे झिजविण्याची गरज नाही 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com