Pune : आंबेगावातील पारगावच्या अपक्ष सरपंचानी घेतली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट

निवडून आल्यावर श्वेता ढोबळे यांनी जाहीर केले होते मी राष्ट्रवादी कडे उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी नाकारल्यानंतर मी अपक्ष निवडणूक लढवली
independent sarpanch of Pargaon met former Union Minister Sharad Pawar politics
independent sarpanch of Pargaon met former Union Minister Sharad Pawar politicsSakal

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पारगाव येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी अपक्ष म्हणुन निवडून आलेल्या श्वेता किरण ढोबळे यांनी काल शुक्रवारी पुणे येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्वेता ढोबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या आहे. श्वेता ढोबळे यांनी प्रचार दरम्यान फ्लेक्सबोर्डवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सह राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्र वापरली होती.

निवडून आल्यावर श्वेता ढोबळे यांनी जाहीर केले होते मी राष्ट्रवादी कडे उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी नाकारल्यानंतर मी अपक्ष निवडणूक लढवली मी निवडून येण्यासाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची मदत झाली त्यामुळे मी सर्वपक्षीय असल्याचे जाहीर केले होते.

निकाल जाहीर झाल्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी सपत्नीक श्वेता ढोबळे यांचा सत्कार केला होता. स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत लोखंडे , युवा सेना शाखा प्रमुख अनिल शेवाळे यांनीही त्यांचा जाहीर सत्कार केला होता

काल शुक्रवारी पुणे येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. श्री. पवार यांनी श्वेता ढोबळे यांच्या निवडीबद्दल सत्कार केला याप्रसंगी अनिल ढोबळे, नितीन ढोबळे, उद्योजक अमित ढोबळे, गणेश ढोबळे, अश्विनी ढोबळे, विशाल मारुती ढोबळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com