

द्विपक्षीय संबंध दृढ
करण्यावर चर्चा
नवी दिल्लीत भारत-अर्जेंटिना मैत्री गटाची बैठक
नांदेड, ता. १२ : भारत आणि अर्जेंटिना याच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासोबतच व्यापार, उद्योग क्षेत्रातील सहकार्याला नवी चालना देण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या संसदीय मैत्री गटाची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील संसद भवन विस्तार इमारतीत झाली.
मैत्री गटाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक संबंध विस्तारण्यावर चर्चा झाली. मैत्री गटाची ही पहिलीच बैठक होती. भारत आणि अर्जेंटिना यांच्यात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत, याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. व्यापार, उद्योग क्षेत्रातील संबंध अधिक व्यापक झाल्यास दोन्ही देशांना, विशेषतः भारताला, होणाऱ्या संभाव्य लाभांवरही विचारविनिमय करण्यात आला. भारत-अर्जेंटिना यांच्यातील आर्थिक संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी दोन्ही देशांमधील उद्योग व व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये संवाद वाढविण्याची गरज अधोरेखित केली. द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देण्यासाठी पुढील बैठकीस अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो ऑगस्टिन कॉसिनो तसेच भारतातील प्रमुख व्यापार- उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.