महात्मा गांधी म्हणजेच भारत - डॉ. सिंह 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

""महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे आहेत. जगात भारताची ओळख त्यांच्यामुळेच आहे, त्यामुळे गांधी म्हणजेच भारत आहे,'' असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी संचालक व "मिरी'चे महासंचालक प्रा. डॉ. प्रीतम सिंह यांनी केले. 

पुणे -  ""महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे आहेत. जगात भारताची ओळख त्यांच्यामुळेच आहे, त्यामुळे गांधी म्हणजेच भारत आहे,'' असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी संचालक व "मिरी'चे महासंचालक प्रा. डॉ. प्रीतम सिंह यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे "भारत अस्मिता राष्ट्रीय' पुरस्कार डॉ. प्रीतम सिंह आणि वेल्लूर येथील ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका तथा शास्त्रज्ञ प्रा. डॉ. गगनदीप कांग यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, "एमआयटी'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ताम्रपट व सव्वालाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, "एमआयटी'चे राहुल कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. शरदचंद्र पाटील, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, प्रकुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, डॉ. आर. एम. चिटणीस व प्रा. दीपक आपटे या वेळी उपस्थित होते. 

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

प्रा. डॉ. कांग म्हणाल्या, ""लोकसंख्यावाढ ही मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात आरोग्याच्या अपुऱ्या सुविधांमुळे लहानांबरोबरच वयोवृद्धही आजाराशी लढा देत आहेत. डायरियासारख्या दुर्धर रोगांवर लस तयार करून अनेकांना जीवनदान दिले आहे. भविष्यात भारत लसनिर्मितीमध्ये जगाचे नेतृत्व करील. विज्ञान, तंत्रज्ञान, हेल्थकेअर यासारख्या शाखा या जीवन जगण्याची प्रयोगशाळा आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा समन्वय करून आरोग्य क्षेत्रात काय करता येईल, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Asmita National Award