

Scorching heat and unexpected rains likely this summer, raising concerns for health and farming sectors.
sakal
पुणे : एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारी उष्णतेची लाट, तर दुसऱ्या बाजूला ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी, असा दुहेरी आणि विचित्र हवामानाचा सामना यंदा नागरिकांना करावा लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने उन्हाळी हंगामासाठी जाहीर केलेल्या नव्या अंदाजानुसार, यंदाचा उन्हाळा अत्यंत ‘विरोधाभासी’ ठरणार आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट तीव्र होणार असतानाच, एप्रिल महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा चक्क ११२ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही मोठे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.