Dr. Mohan Bhagwat : येत्या २० वर्षात भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न गाठू शकेल; डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास
सहकारनगर परिसरातील दशभुजा गणपती मंदिराजवळच्या फुलोरा मैदानावर आयोजित ‘सहजीवन व्याख्यानमाले’त ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर डॉ. भागवत यांनी आपले विचार मांडले.
पुणे - ‘अद्ययावत सुख-सुविधा व संपत्ती मिळवून जगात शांती नाही म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. त्याची पूर्तता भारत करू शकतो. जात-पात, धर्मभेद विसरून संतांच्या विचारसरणीनुसार समदृष्टीचा अवलंब करणे म्हणजे विश्वगुरुत्व आहे.