चीनला तोंड देण्यास भारतीय लष्कर सक्षम: लेफ्टनंट जनरल शेकटकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

डोकलाम येथील सध्याची परिस्थिती, भारताची भूमिका, चीनचे एकंदर भूराजकीय धोरण, पाकिस्तान व चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र, हिंदी महासागरामधील चिनी नौदलाच्या हालचाली, चीनमधील अंतर्गत परिस्थिती, भारतीय लष्कराची तयारी, माध्यमांची भूमिका अशा अनेक संवेदनशील विषयांवर शेकटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले

पुणे - "दोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने तणाव निर्माण झाला आहे. मात्र आता परिस्थिती बदलली असून भारतीय लष्कर हे चिनी सैन्यास तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. अर्थात अशा परिस्थितीतही भारताकडून चिनी कोणत्याही स्वरुपाची चिथावणी देण्याची आवश्‍यकता नाही. भारताने युद्धज्वराची बाधा टाळावयास हवी,' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. शेकटकर हे आज "सकाळ'च्या कार्यालयामध्ये "डोकलाम व भारत-चीन राजकारण' या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते.

या दीर्घ मुलाखतीमध्ये शेकटकर यांनी भारत-चीन संबंधांमधील विविध मुद्यांचा विस्तृत आढावा घेतला. डोकलाम येथील सध्याची परिस्थिती, भारताची भूमिका, चीनचे एकंदर भूराजकीय धोरण, पाकिस्तान व चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र, हिंदी महासागरामधील चिनी नौदलाच्या हालचाली, चीनमधील अंतर्गत परिस्थिती, भारतीय लष्कराची तयारी, माध्यमांची भूमिका अशा अनेक संवेदनशील विषयांवर शेकटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विशेषत: गेल्या काही वर्षांत भारतीय धोरणामध्ये झालेला बदल त्यांनी प्रभावीरित्या अधोरेखित केला.

Web Title: india ready to take on china, says Lt. Gen D. B. Shekatkar