पुणे - इतर देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात व महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली दिसून येत नाही. दरम्यान, परदेशातील आढळत असलेल्या रुग्णांमधील विषाणू हा कोरोना विषाणूंच्या दोन उपप्रकारांपासून नवीन उपप्रकार तयार झालेला आहे.