बिहार रेजिमेंट मध्ये मेजर सुभेदार पद मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले जवान सुभाष पालेकर पाटील

मांदळेवाडी ता. आंबेगाव येथील लष्करातील जवान मेजर सुभाष सदाशिव पालेकर पाटील यांना बिहार रेजिमेंट मध्ये मेजर सुभेदार पदी पदोन्नती मिळाली आहे.
indian army bihar regiment major subedar post to maharashtra subhash palekar patil
indian army bihar regiment major subedar post to maharashtra subhash palekar patilsakal

पारगाव : मांदळेवाडी ता. आंबेगाव येथील लष्करातील जवान मेजर सुभाष सदाशिव पालेकर पाटील यांना बिहार रेजिमेंट मध्ये मेजर सुभेदार पदी पदोन्नती मिळाली आहे. मेजर पालेकर पाटील हे बिहार रेजिमेंट मध्ये मेजर सुभेदार पद मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले जवान आहे त्याबद्दल राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

मेजर सुभाष पालेकर पाटील हे एक जानेवारी १९९८ ला बिहार रेजिमेंट मध्ये इन्फोन्ट्री बटालियन मध्ये जवान म्हणुन रुजू झाले. त्यांनी पंजाब, जम्मू काश्मीर, सिक्कीम, नागालैण्ड, आसाम , अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यात सेवा केली त्यांना आर्मी कमांडरचे प्रशस्ती पत्र मिळाले असून विशेष म्हणजे उत्तर आफ्रिका मधून वेगळे झालेल्या सुदान देशात भारत सरकारने पाठवलेल्या लष्कराच्या शांती सेनेत त्यांची निवड झाली होती.

त्यांनी देशाबाहेरही सुदान देशात एक वर्ष सेवा केली आहे त्या बद्दल त्यांचा फोर्स कमांडर सुदान प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला होता नुकतेच त्यांना बिहार रेजिमेंट मध्ये मेजर सुभेदार पदावर बढती मिळाली आहे त्याबद्दल मांदळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने थापेवाडी (ता. शिरूर) येथील माऊली लॉन्स कार्यालयात आयोजित विशेष समारंभात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष निलेश थोरात , खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज, प्रकाश पवार, मांदळेवाडीच्या सरपंच ऊज्वला अतुल आदक, सुनील ऊर्फ बाबु आदक , फकिरा आदक, देवराम मिंडे, संजय पोखरकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com