esakal | Rain Updates : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला हवामान खात्यानं दिला इशारा!
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

सोमवार (ता. 5) पर्यंत राज्यातील आकाश ढगाळ असेल, तर तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

Rain Updates : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला हवामान खात्यानं दिला इशारा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

शनिवारी चिपळूण येथे सर्वाधिक 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवार (ता. 5) पर्यंत राज्यातील आकाश ढगाळ असेल, तर तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास दक्षिण राजस्थान, उत्तरप्रदेश आणि उत्तरपूर्व मध्यप्रदेश पर्यंत आला आहे. राज्यातून परत फिरण्यासाठी अजून मॉन्सूनच्या वाऱ्यांना वेळ आहे. शनिवारी राज्यातील बहुतेक भागात आकाश दुपारपर्यंत निरभ्र होते. त्यामुळे तापमानात वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला येथे 36.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

पुणे-सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; सौरप्रकल्प ठरणार वरदान!​

पुण्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता 
शहर आणि जिल्ह्यात सोमवार (ता.5) पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारनंतर हा पाऊस पडण्याची शक्‍यता जास्त आहे. शनिवारी लोहगाव येथे 2.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2.3 अंश सेल्सिअसच वाढ होत 33.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तापमानात किंचितशी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)