esakal | घाटमाथ्यावर मुसळधार, तर उर्वरीत महाराष्ट्रात 'असा' बरसणार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Rain_Ghat_Area

जूननंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली होती. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

घाटमाथ्यावर मुसळधार, तर उर्वरीत महाराष्ट्रात 'असा' बरसणार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्यदिनापर्यंत म्हणजे येत्या १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील पावसाचा जोर कायम राहणार आहे. बहुतेक ठिकाणी जोरदार तर कोकणासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील चोवीस तासात महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक म्हणजेच ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

श्रावणात घन निळा बरसला; पुण्यात दिवसभर पावसाची संततधार!​

गुरुवारी दिवसभर कोकणासह मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात मुसळधार पाऊस पडला. पुढील दोन दिवस तरी वरुणराजाची कृपा राज्यावर अशीच असणार आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा सुटेल. तसेच, शुक्रवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जूननंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली होती. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील पाच ते सहा दिवस अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खाते वर्तवत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्‍चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांचाही प्रभाव वाढत असल्याचे हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी सांगितले आहे. 

तरुण-तरुणींनो, मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करताय? तर 'जोकर'पासून राहा सावध​

मुंबईत वादळवाऱ्याची शक्‍यता :
मुंबई शहर आणि उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार मागील चोवीस तासात कुलाब्यात १७.८, तर सांताक्रुझ येथे ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र दिवसभर शहरात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील दोन दिवस तरी शहरात जोरदार पाऊस असेल. 

गुरुवारी दिवसभरातील पाऊस (मिलिमीटरमध्ये) :
महाबळेश्‍वर : ७८ 
नाशिक : १५ 
सातारा : ४१ 
नागपूर : १५ 
पुणे : १० 
मुंबई : २ 
औरंगाबाद : ४

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)