संगीत शिकताय; गरिबीची तयारी ठेवा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पुणे - ‘‘गाण्याची एक स्वतंत्र साधना असते. ती वर्षानुवर्षे करत राहावी लागते. त्यात शॉर्टकट नाहीत. लगेच खूप सारा पैसा मिळेल, अशी खात्रीही नाही. त्यामुळे गाण्यात करिअर करायचे असेल आणि त्यातही वेगळ्या पद्धतीच्या वाटेने जायचे असेल, तर पैसे कमी मिळतील याची तयारी ठेवा. संयम बाळगा. ‘बी रेडी टू बी पुअर फॉर लाँगर टाइम’ !... अशा शब्दांत ‘इंडियन ओशन’ बॅंडचे वादक राहुल राम यांनी सल्ला दिला.

‘वसंतोत्सवा’निमित्त पुण्यात आलेल्या राहुल यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर गप्पा मारल्या.
ते म्हणाले, ‘‘एका ग्रामीण भागात गेलो आणि केले तयार लोकसंगीत’ अशी संगीतनिर्मिती होत नसते. संगीत हे नैसर्गिकरीत्या आणि आतून यावे लागते. ‘संगीत आत्मा की पुकार हैं... गाना वहीं हैं, जो हमारी जिंदगी से होता हैं!’ जगण्यातल्या संघर्षातून आणि भवतालातून गाणे आपोआप निर्मिले जात असते. मग रॉक, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत असे सगळे प्रकार एका मर्यादेनंतर त्या व्यापक संगीतविश्‍वाचा भागच असतात. आमच्यासारखे कलाकार, तर फक्त निमित्त...’’

‘‘आम्ही जेव्हा बॅंड सुरू केला, त्या काळात चांगल्या वाद्यांसाठी खूप वणवण करावी लागायची. आजचा काळ मात्र बॅंडसंस्कृतीसाठी खूपच अनुकूल आहे. आज गिटार, ड्रमसेट्‌स, ॲम्प यांसह विविध वाद्ये लगेच मिळतात. आज महोत्सवांच्या निमित्ताने संधी उपलब्ध आहेत,’’ असेही ते म्हणाले.
‘गाणं असतं हलव्यासारखं’

राहुल म्हणाले, ‘‘आम्ही हुक्की आली की, सगळे जण असे एकत्र बसतो आणि आमची वाद्ये वाजवायला सुरवात करतो; पण ही हुक्की म्हणजे संगीताची हुक्की असते. त्यात एकप्रकारची धुंद असते, टीम म्हणून एक समन्वय असतो आणि एखादे उत्तम गाणे तयार करण्याची ऊर्मी असते. मग नवनव्या संकल्पना पुढे येत जातात आणि गाणे आकार घेऊ लागते. गाणे तयार करण्याची प्रक्रिया ही हलवा तयार करण्याच्या पाककृतीसारखीच तर असते.’’

Web Title: Indian Ocean band player Rahul Ram