मिलिंद शहा यांच्या छायाचित्राला 'इंडीयन फोटोग्राफी अवॉर्ड'

मिलिंद संगई
शनिवार, 16 जून 2018

बारामती - शहरातील उद्योजक व हौशी छायाचित्रकार मिलिंद शहा (साकल्प) यांनी टीपलेल्या छायाचित्राला 'इंडीयन फोटोग्राफी अवॉर्ड' स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. देशभरातील हौशी छायाचित्रकारांनी देश विदेशात फिरत असताना टीपलेल्या छायाचित्रांची ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असते. 

नोव्हेंबर 2017 मध्ये कोल्हापूर नजिक फलटण कोडोली येथील श्री खंडोबा मंदीराच्या काढलेल्या मिरवणूकीदरम्यान मिलिंद शहा यांनी ढोलवादकाच्या उलट्या उडीचे छायाचित्र अचूकपणे टीपले होते. या छायाचित्राचे वेगळेपणे, नैसर्गिकता आणि अचूक क्षण यांचा विचार करुन मिलिंद शहा यांना या स्पर्धेत तृतीय क्रमांक बहाल करण्यात आला. 

ग्रामीण भागातून प्रथमच शहा यांना हे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

Web Title: Indian photography award for Milind Shah's photo