

दुबई, ता. १४ (पीटीआय) : ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला झाल्याची घटना घडली असून, या जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (ता. १४) स्पष्ट केले. बुधवारी (ता. १३) झालेल्या या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत भारतात २० हजार टन द्रवरूप प्रोपेन आणि ब्युटेन गॅस घेऊन ‘सायमी’ जहाज दीनदयाळ बंदरात दाखल झाले. याशिवाय ‘एलपीजी’ घेऊन एनव्ही सनशाईन जहाज मंगळुरू बंदरात दाखल झाले.
परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय जहाजावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. व्यापारी जहाजे आणि निरपराध खलाशांना लक्ष्य केले जाणे ही गंभीर बाब आहे. जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असून, त्यांच्या सुटकेसाठी मदत केल्याबद्दल आम्ही ओमान प्रशासनाचे आभार मानतो. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे आणि सागरी व्यापारात अडथळे निर्माण करणे टाळले पाहिजे, अशीच भारताची भूमिका आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरातील असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.
जहाजे भारताकडे
जहाजावरील हल्ल्यानंतरही भारताकडे येणारी ‘एलपीजी’ जहाजे या मार्गावरून प्रवास करीत आहेत. यामध्ये मार्शल आयलंडचा ध्वज असलेले ‘सिमी’ आणि व्हिएतनामचे ‘एनव्ही सनशाईन’ ही जहाजे भारताच्या दिशेने येत आहेत. जहाजांच्या या वाहतुकीवर परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण आणि पेट्रोलियम मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.