

भारतीय मानकांबाबत उद्योजकांना मार्गदर्शन
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये जनजागृती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आणि भारतीय मानक ब्युरोच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी भारतीय मानके, प्रमाणन प्रक्रिया आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत जनजागृती कार्यक्रम झाला.
या वेळी बीआयएसचे वैज्ञानिक तथा संयुक्त संचालक कुमार हर्षवर्धन, हर्षमोहन शुक्ला, रोहित वाघमारे, असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, कार्यकारी सदस्य कमलेश शहा, रामेश्वरी गायकवाड, तारासिंग राठोड, जयपाल महिंद्रकर आणि व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
भारतीय मानकांचे महत्त्व, आयएसआय चिन्ह, गुणवत्ता नियंत्रण आदेश, प्रमाणन प्रक्रिया तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध संधींची माहिती देण्यात आली. स्पर्धात्मक वातावरणात उत्पादनाची गुणवत्ता, सुरक्षितता व विश्वासार्हता वाढविण्यासाठी मानकांचे पालन आवश्यक असल्याचे कुमार हर्षवर्धन यांनी सांगितले. सूत्रसंचालन शुद्धोधन गायकवाड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.