‘ऑनलाइन’मध्ये भारताची आघाडी; तीन महिन्यांत जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ट्रान्झॅक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

लॉकडाउननंतर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत भारतीयांनी पैशांच्या देवाणघेवाणीसाठी जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शन केले आहे. मोबाईलवरील ॲपद्वारे ५.७७ अब्ज, नेट बॅंकिंगद्वारे ०.८४ अब्ज, युपीआयद्वारे १.८ अब्ज ऑनलाइन पेमेंट करण्यात आले आहे. तिमाहीतील या ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शनची बेरीज ८.४१ अब्ज होत असून, ही जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

पुणे - लॉकडाउननंतर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत भारतीयांनी पैशांच्या देवाणघेवाणीसाठी जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शन केले आहे. मोबाईलवरील ॲपद्वारे ५.७७ अब्ज, नेट बॅंकिंगद्वारे ०.८४ अब्ज, युपीआयद्वारे १.८ अब्ज ऑनलाइन पेमेंट करण्यात आले आहे. तिमाहीतील या ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शनची बेरीज ८.४१ अब्ज होत असून, ही जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या आधीच भारतीयांनी ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शनमध्ये वाढ केली होती. लॉकडाउनमध्ये त्याची गरज अधिक वाढली आणि अनलॉक सुरू होताच भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शनला बूस्टर डोस दिला आहे. 

व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाला अद्याप प्रतिक्षा

ऑनलाइन पेमेंटमध्ये सुरक्षितता वाढावी म्हणून रिझर्व्ह बॅंकेने जूनमध्ये ‘देयक पायाभूत सुविधा विकास निधी’ (पीआयडीएफ) ची स्थापना केली आहे. पाच अब्ज रुपयांच्या निधीमुळे ऑनलाइन पेमेंटसंबंधीच्या पायाभूत सुविधांचा विकास तर होईल, त्याचबरोबर विश्‍वासार्हताही वाढेल, असे मत अहवाल सादर करणाऱ्या वर्ल्ड लाइन संस्थेचे सुनील रोंगला यांनी व्यक्त केले 
आहे.

सावधान! Redmi Mi7 प्रो स्वस्तात घेण्याचा फंडा पडला महागात; सायबर चोरट्यांनी गंडवलं

तिसऱ्या तिमाहीचा आढावा...
१) मोबाईल ॲपद्वारे पेमेंट 

 • दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत ३७ टक्‍क्‍यांनी वाढ
 • ५.७७ अब्ज मोबाईल ट्रान्झॅक्‍शनपैकी ९१ टक्के ट्रान्झॅक्‍शन दोन वेगवेगळ्या बॅंकेच्या ग्राहकांमध्ये झाले आहे.
 • ॲपद्वारे साधारणतः २०.०८ ट्रिलीयन रकमेची देवाणघेवाण झाली. हे मूल्य दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३८ टक्‍क्‍यांनी वाढले
 • छोट्या रकमेच्या ट्रान्झॅक्‍शनसाठी मोबाईल ॲपचा वापर

२) नेट बॅंकिंग

 • दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत ३५ टक्‍क्‍यांनी वाढ
 • ७९ टक्के ट्रान्झॅक्‍शन दोन वेगवेगळ्या बॅंकेच्या ग्राहकांमध्ये झाले आहे.
 • ॲपद्वारे साधारणतः ९६.९३ ट्रिलीयन रुपयांची देवाणघेवाण झाली. हे मूल्य दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २३.५२ टक्‍क्‍यांनी वाढले
 • मोठ्या रकमेच्या ट्रान्झॅक्‍शनसाठी वापर

३) युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) ः 

 • दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ८२ टक्‍क्‍यांनी वाढ
 • साधारण ३ ट्रिलीयन रुपयांची देवाणघेवाण
 • युपीआयमध्ये तिसऱ्या तिमाहीत १९ बॅंकेने सहभाग घेतला असून, युपीआयचे मोबाईल ॲप्लिकेशन असलेल्या ‘भीम’मध्ये बॅंकांची संख्या १७४ वर पोचली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias lead online transactions exceeded worlds population three months