

IndiGo Controversy Flight Diverted to Egypt Passengers Allege Mismanagement
Esakal
पुणे, ता. २१: अवघ्या नऊ ते दहा तासांत पूर्ण होणारा लंडन ते मुंबई प्रवास तब्बल तीन दिवसांचा त्रास ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक वकील व त्यांच्या मुलासह २५० प्रवाशांना विमान कंपनीचा निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापनाचा मोठा फटका बसला. प्रवासादरम्यान विमानाला अचानक वळवून इजिप्तमध्ये उतरविण्यात आले, तसेच प्रवाशांना तासन् तास कोणतीही माहिती न देता विमानातच बसवून ठेवण्यात आले.