इंदूरमधील कॉल सेंटरवर पुणे सायबर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पुणे - तीन दिवसांत दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने इंदूर येथील बीपीओ कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली. आरोपींनी पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, सांगली आणि नागपूर येथील नागरिकांना लाखो रुपयांना लुबाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे - तीन दिवसांत दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने इंदूर येथील बीपीओ कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली. आरोपींनी पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, सांगली आणि नागपूर येथील नागरिकांना लाखो रुपयांना लुबाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मनीष जैन (वय 27), राजेश सिंग अनुपसिंग राठोड (वय 36) आणि रोजेशसिंग श्रीरामसिंग रजपूत (वय 32, तिघेही रा. इंदूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तिरुमूर्ती पूम नाडर (वय 70, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नाडर यांचे शेअरकम कंपनीमध्ये डी-मॅट अकाउंट होते. आरोपींनी त्यांची माहिती घेऊन मोबाईलवर संपर्क साधला. पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यात 11 हजार रुपये भरल्यानंतर तीन दिवसांत 15 हजार रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानुसार, पैसे भरल्यानंतर त्यांना ती रक्‍कम मिळाली. त्यानंतर आरोपींनी एक लाख रुपये भरल्यानंतर पाच लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानुसार नारडे यांनी 24 ऑगस्ट रोजी बॅंक खात्यात एक लाख रुपये भरले. परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. पण आरोपींनी फोन बंद केले. याबाबत नारडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

गुन्हे शाखेचे पोलिसही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. त्यांना आरोपी इंदूर येथे असल्याचे समजले. पोलिस उपायुक्‍त दीपक साकोरे आणि वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक नीता मिसाळ, उपनिरीक्षक नितीन खामगळ, प्रवीण स्वामी, कर्मचारी संतोष जाधव, अस्लम अत्तार, राजू भिसे यांच्या पथकाने इंदूर येथील कॉल सेंटरवर छापा टाकला. तेथून तिघांना अटक करून मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली. या कॉल सेंटरमध्ये सुमारे दीडशे कर्मचारी काम करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Web Title: Indore call center in Pune cyber police raid