पुरात अडकलेल्या वृद्ध दांपत्याची सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पिंपरी - इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे मोई येथील स्मशानभूमीत अडकलेल्या वृद्ध दांपत्याची आणि त्यांच्या चार कुत्र्यांची पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाने सोमवारी (ता. १६) दुपारी सुखरूप सुटका केली.

पिंपरी - इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे मोई येथील स्मशानभूमीत अडकलेल्या वृद्ध दांपत्याची आणि त्यांच्या चार कुत्र्यांची पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाने सोमवारी (ता. १६) दुपारी सुखरूप सुटका केली.

राम लखन शर्मन (वय ७५) आणि मालन राम शर्मन (वय ७०, दोघेही सध्या रा. नवीन स्मशान भूमी, मोई) असे या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजता मोई येथील इंद्रायणी नदीपात्रात असलेल्या नवीन स्मशानभूमीत एक वृद्ध दांपत्य अडकल्याची माहिती सरपंच नीलेश गवारे यांनी मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांना दिली. त्यानुसार अग्निशामक विभागाची एक रेस्क्‍यू व्हॅन आणि दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. रबरी बोट टाकून प्रथम राम शर्मन आणि त्यांच्या दोन कुत्र्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, मालन मागे राहिल्याने कुत्र्यांनी बोटीतून उडी मारत पुन्हा घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर मालन शर्मन यांना बाहेर काढले. त्यावेळीदेखील कुत्रे बोटीत आले नाहीत. शर्मन दांपत्य गेल्या काही महिन्यांपासून नवीन स्मशानभूमी परिसरात वास्तव्यास आहेत. मासेमारी करून ते आपली उपजीविका करतात.

 

Web Title: indrayani river flood old couple release