जलपर्णी काढल्याने नदीपात्रात स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

आळंदी - आळंदीतील इंद्रायणी नदीत वाढलेली बेसुमार जलपर्णी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर काढून टाकण्याची मोहीम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत जलपर्णी काढल्यामुळे नदीपात्र वारकऱ्यांना स्नानासाठी स्वच्छ झाल्याची माहिती आळंदी पालिका मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.

भूमकर म्हणाले, आळंदीतील कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत आहेत. सध्या प्रदूषणामुळे इंद्रायणी नदीत बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य बंधाऱ्यातही जलपर्णी अडविण्याचे काम सुरू आहे, तर इंद्रायणीनगर ते गरुड स्तंभालगतच्या बंधाऱ्याजवळील पात्रात गेली काही महिने जलपर्णी प्रदूषित पाण्यामुळे वाढली होती. याचबरोबर राडारोडाही होता. सध्या जलपर्णी काढली जात असून, यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशिन लावण्यात आले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत काम सुरू आहे. जवळपास बावीस ट्रॅक्‍टर भरून जलपर्णी काढली आहे. वाहतुकीसाठी पालिकेचे ट्रॅक्‍टर लावले आहेत. नदीपात्रातून काढलेली जलपर्णी गायरानातील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेत नेली जात आहे. दरम्यान, नदीपात्रातून जलपर्णी हटविल्यामुळे पाणी निवळले आहे, तर माशांसाठी पूरक वातावरण नदीपात्रात झाले.

Web Title: Indrayani River Jalparni Cleaning