औद्योगिक विकास परिषदेचे आज पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पिंपरी - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या पुरस्कारांचे मंगळवारी (ता. ८) वितरण चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर सभागृहात सायंकाळी चार वाजता होणार आहे.  

पिंपरी - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या पुरस्कारांचे मंगळवारी (ता. ८) वितरण चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर सभागृहात सायंकाळी चार वाजता होणार आहे.  

भोसरीतील डायनोमर्क उद्योगचे प्रमुख किशोर राऊत यांना (भारतरत्न जे. आर. डी. उद्योगरत्न), सुशील इंजिनिअर्सचे एस. जी. शिरूरे (उद्योगविकास रत्न), श्रीगोंदा येथील शेतकरी दत्तात्रेय कोठारे यांना (कृषिउद्योग भूषण), ॲनालॉजिक ऑटोमेशनचे संचालक रवींद्र कल्याणकर, प्राची फिक्‍चरचे संचालक दयानंद कोटे (उद्योगभूषण) भोसरीच्या थर्माकोल पॅकेजिंगच्या संचालिका शोभा माने यांना (उद्योगसखी) या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. खासदार अमर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर उपस्थित राहातील. ‘जे. आर. डी. टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावर गुणवंत कामगार बाजीराव सातपुते यांचे व्याख्यान होणार आहे.

Web Title: Industrial Development Council today the awards distribution ceremoney