देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला सज्ज - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी मोदी यांच्या हस्ते हिंजवडी-शिवाजीनगर या पुणे मेट्रोलाइन तीनचे भूमिपूजन झाले. या वेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, ""देशात डिजिटल इंडिया अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. डिजिटल इंडिया आणि "मेक इन इंडिया'मुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. सामान्य लोकांना सरकारी सेवा वेगाने उपलब्ध होत आहेत. देशातील गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. लोकांसाठी सोपे आणि पारदर्शक नियम बनिवण्याचे सरकारचे धोरण आहे.

मोदी पुण्यात म्हणाले...
महाराष्ट्रात एक लाख एलईडी पथदिवे
मेट्रोसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण
येत्या वर्षअखेरीस पुण्यात 12 किमीपर्यंत मेट्रो धावेल
हिंजवडी-शिवाजीनगरसाठी मेट्रोसेवा लाभदायी
देशात साडेसहाशे किमी मेट्रोचे काम प्रगतिपथावर
स्मार्ट सिटीची साडेतीन हजार कोटींची कामे सुरू

Web Title: Industrial revolution Narendra Modi