पुरंदरच्या प्रसिद्ध वाटाण्याला काळी बुरशीचा प्रादुर्भाव

दत्ता भोंगळे
Wednesday, 5 August 2020

पुरंदरच्या पश्चिम भागात पावसाने पाठ फिरवली असुन विचित्र हवामानामुळे वाटाण्यावर काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने वाटाण्याचे पिक जवळजवळ घोक्यात आले आहे.

गराडे - पुरंदरच्या पश्चिम भागात पावसाने पाठ फिरवली असुन विचित्र हवामानामुळे वाटाण्यावर काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने वाटाण्याचे पिक जवळजवळ घोक्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाटाण्यावर काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने झाडाचा शेंडा पुर्णपणे काळा होत असुन झाडाची वाढ खुंटुन झाडे जळत आहेत. तसेच त्या झाडावर असणाऱ्या शेंगेची वाढ होत नाही. पर्यायी उत्पादनात मोठीत घट होत असुन शेतंची-शेत जागांवर जळु लागल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन काही ठिकाणी वाटाणा बियाणाचे पैसे देखिल निघणार नसल्याचे शेतकरी व चांबळी गावचे तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब कामठे, मारुती कामठे, शहाजी कामठे यांनी सांगितले.

उत्पादन घटल्याने वाटाण्याचा भाव तेजीत आले आहेत. सध्या ८० ते १०० रुपये प्रति किलो पर्यंत वाटाण्याची किरकोळ विक्री होत आहे. इतर वेळी ४० ते ६० रुपये किलोने हा वाटाणा विकला जातो.

पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यातील गराडे, भिवरी, भिवडी, सोमर्डी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, देवडी, केतकावळे हा परिसर पावसाचा आगार म्हणून ओळखला जातो. पण सध्या या भागात पावसाने ओढ दिली आहे.     

तर हिवरे, चांबळी बोपगाव, कोडीत, गराडे, भिवरी, सोमुर्डी या भागात वाटाणा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकावर कमी पावसाचे प्रमाण व वातावरणातील बदल यामुळे करपा व काळी बुरशी रोगाचे प्रमाण अधिक असल्याने वाटाणा पिक धोक्यात आले आहे. लागवडीच्या ८० टक्के पिक घोक्यात जाण्याची शक्यता आहे.
    
पुरंदरमध्ये वाटाण्याचे सरासरी १३४२ हेक्‍टर क्षेत्र लागवडीचे आहे. यात १३५०.६५ टक्के पेरणी झाल्यामुळे सरासरीचा आकडा १००.७२ टक्के वर गेला आहे. वाटण्यावर काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी काळी बुरशी रोगाबद्दल योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी सहाय्यक शिवानंद बिराजदार यांनी केले.

काळी बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २५ ग्रॅम गंधक व १० ग्रॅम स्टिकर १० लिटर पाण्यात मिसळून सकाळी सात ते नऊ किंवा सायंकाळी फवारावे. तसेच शेतात पाणी साठलेले असेल तर ते काढून द्यावे अशी माहिती मंडल कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infestation of black fungus on the famous pea of Purandar

Tags
टॉपिकस
Topic Tags: