esakal | पुण्यातील मार्केट यार्डाबाबत महत्वाचे अपडेट; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

market

- मार्केट यार्डात शेतीमालाची आवक वाढली. 
- ग्राहकांची संख्याही वाढत आहे.

पुण्यातील मार्केट यार्डाबाबत महत्वाचे अपडेट; वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रविण डोके

मार्केट यार्ड : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमालाची आवक वाढू लागली आहे. तसेच किरकोळ बाजार सुरू झाल्याने ग्राहकांची संख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात शेतीमालाची आवक साधारणतः 10 ट्रक जास्त झाली आहे. रविवारी ७० ट्रक अवाक झाली. फळभाज्यांमध्ये आवकेच्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, घेवडा, तोतापुरी कैरीच्या भावात साधारणतः 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

- धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली

बाजारात कोथिंबिरीची आवक वाढली असल्याने घाऊक बाजारात जुडीमागे 5 तर शेपूच्या जुडीमागे 3 रुपयांनी घट झाली आहे. तसेच आवक घटल्याने मेथीच्या भावात जुडीमागे 4 रुपये, अंबाडी, राजगिरा आणि चुकाच्या भावात प्रती जुडी 2 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.

पराराज्यातून येथील बाजारात हिमाचल प्रदेश येथून 2 ट्रक मटार, इंदौर येथून 2 टेम्पो गाजर, गुजरात, मध्यप्रदेश येथून लसूण 7 ते 8 ट्रक, गुजरात आणि कर्नाटक येथून 3 ते 4 ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथून 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 2 टेम्पो घेवडा तसेच 2 टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली. तर, पुणे विभागातून सातारी आले 500 ते 600 पोती, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 3 ते 4 टेम्पो, ढोबळी मिरची 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 7 ते 8 टेम्पो, भुईमुग 50 ते 60 पोती, कांदा 30 ते 35 टेम्पो आणि आग्रा, इंदौर येथून सुमारे 22 ट्रक बटाट्याची आवक झाली.

- पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 60-90, बटाटा : 170-200, लसूण : 500-800, आले : सातारी 350-450, भेंडी : 200-300, गवार : 200-300, टोमॅटो : 200-250, दोडका : 250-300, हिरवी मिरची : 250-300, दुधी भोपळा : 150-250, चवळी : 150-200, काकडी : 200-250, कारली : हिरवी 250-300, पांढरी 200-250, पापडी : 150-200, पडवळ : 300-400, फ्लॉवर : 120-150, कोबी : 80-100, वांगी : 100-200, डिंगरी : 150-200, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 400-500, तोंडली : कळी 200-250, जाड : 100-150, शेवगा : 400-450, गाजर : इंदौर : 120-140, स्थानिक : 70-80 वालवर : 200-250, बीट : 60-80, घेवडा : 700-800, कोहळा : 100, आर्वी : 300-350, घोसावळे : 150-200, ढेमसे : 200-250, पावटा : 300-400, मटार : परराज्य 750-800, तांबडा भोपळा : 60-80, सुरण : 180-200, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

- कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 700-1500, मेथी : 1500-1600, शेपू : 800-1200, कांदापात : 800-1200, चाकवत : 800-1000, करडई : 800-1000, पुदिना : 400-500, अंबाडी : 800-1000, मुळे : 1200-1500, राजगिरा : 800-1200, चुका : 800-1200, चवळई : 500-800, पालक : 500-800. 

loading image