कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!

Prisoners
Prisoners

पुणे : शहरात मागील एक महिन्यात अचानक घरफोडी, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न ते खून करण्यापर्यंतच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याची सद्यस्थिती आहे. या घटनामध्ये अचानक वाढ होण्यास कोरोनामुळे जामीनावर सुटलेले गुन्हेगार असल्याची शक्यता दिसू लागली आहे. जामीनावर सुटलेले गुन्हेगार आणि किरकोळ चोरी करणाऱ्या व्यक्ती या घरफोडया करण्यात सक्रिय असल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे नागरीकांबरोबच पोलिसांची ही डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा कारागृह प्रशासनाने गंभीर गुन्ह्यातील संशयीत आरेापी वगळून इतर इतर आरेापींना तात्पुरत्या जामीनावर सोडले आहे. त्यामुळे सुमारे अडीचशे ते तीनशेहून अधिक छोटे, मोठे गुन्हेगार कारागृहबाहेर आले. संबंधित गुन्हेगारानी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन न करण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीसरारात कुठलाही अनुचित प्रकार न करता राहणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात परिस्थिती याऊलट असल्याची स्थिती आहे.

'ते' बाहेर आले आणि त्यांचे नेटवर्क झाले सक्रिय!

घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी अशा प्रकारचे विविध गुन्हे करणारे गुन्हेगार कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्कत असलेल्या त्यांचे साथीदारांची पुन्हा जुळवाजुळव केली. तर काही साथीदारांनी आत्तापर्यंत शहरात विविध ठिकाणी बंद असलेल्या घरांची माहिती त्यांना दिली. त्यानंतर पुन्हा ते घरफोडी, जबरी चोरी करण्याच्या कामाला लागले. तर काही जण जुन्या भांडणाचे हिशोब चुकते करण्यात गुंतले. 

...म्हणून ते पुन्हा वळले आपल्या पूर्वीच्या मार्गावर

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हाताला रोजगार नाही. सगळीकडे फक्त बंदच होता. काही गुन्हेगारांना घरातही स्थान नसल्याने अनेकजण दारू पिण्यासाठी एकत्र जमू लागले, मात्र खाण्या-पिण्यासाठी, दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने अनेकजण पुन्हा एकदा घरफोडी, जबरी चोरी करण्याकडे वळले आहेत.

बंद घरे, सोसायटया ठरताहेत लक्ष्य
लॉकडाऊनमध्ये अनेकजण गावी गेले असून ते अद्याप परतलेले नाहीत. तर लॉकडाऊन शिथील झाल्याने बहुतांश नागरीक पुन्हा आपल्या कामाला जाण्यास सुरुवात झाली आहे. याचा फायदा घेत गुन्हेगार बंद घरे, सोसायटयातील बंद सदनिकामध्ये चोरी करीत आहेत. किरकोळ कारण काढत सोसायटीभोवती फेऱ्या मारणे, सुरक्षा रक्षकाला धमकाविणे, मारहाण करुन बंद घराची पाहणी करीत आहेत.

गुन्हेगारांच्या जीवालाही धोका 
कोरोनामुळे कमी शिक्षा झालेले किंवा किरकोळ गुन्हेगार जामीनावर कारागृहाबाहेर आले. मात्र त्यांचे पूर्ववैमनस्य असलेल्या लोकांकडून या गुन्हेगारांना मारहाणीपासून त्यांना जीवे मारण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही जिवाला धोका असल्याची सद्यस्थिती आहे. 2 ते 3 घटनामध्ये जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा खून झाल्याचे किंवा त्यांनी खून केल्याचेही प्रकार घडले आहेत.

चोरी, घरफोडी टाळण्यासाठी या उपायांची गरज
- पोलिसांची रात्र गस्त वाढविणे
- प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमणे किंवा त्यांना प्रशिक्षण देणे
- खबर मिळाल्यानंतर पोलिसांकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळणे
- नागरीक, सोसायटयाच्या अध्यक्षानी त्यांच्याकडील बंद घराबाबत पोलिसांना पूर्वकल्पना देणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शहरातील घरफोड़या, जबरी चोरी या कारागृहातुन जामीनावर सुटलेल्या गुन्हेगारांकडुन केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  200 ते 300 गुन्हेगार जामीनावर बाहेर आले आहेत. त्यामध्ये 2 -3 घटनामध्ये खुनाचे प्रकार घडले आहेत. आम्ही ही जामीनावर सुटलेल्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करन्यावर भर देत आहोत."

- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com