धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली

Corona-Virus
Corona-Virus
Updated on

पुणे : कोरोना झालेल्या एका दोन महिन्याच्या चिमुरड्याचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचे आठवडभरानंतर उघडकीस आले आहे. गंभीर म्हणजे, महापालिकेच्या दप्तरीही सात दिवसांनी चिमुरड्याच्या मृत्युची नोंद दाखविली गेली आहे. तीही अहवालापुरतीच.

पण, ही घटना कशी घटली? ती इतके दिवस का लपविली? तिला जबाबदार कोण? याचा ठावठिकाणा महापालिकेला नाही. ही बाब निदर्शनास आणून देऊनही चौकशी करण्यापलीकडे महापालिकेची यंत्रणा शनिवारी (ता.१३) रात्री हलली नाही. "संबंधित हॉस्पिटलला नोटिस पाठविण्याचा सोपस्कार करण्याचे आश्‍वासन देऊन महापालिकेच्या आरोग्य खात्याचे अधिकारी मोकळेही झाले. 

सोमवार पेठेतील केईएम हॉस्पिटलमध्ये 3 जूनला दोन महिन्यांच्या बाळाला (मुलगा) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आणि तो कोरोना "पॉझिटिव्ह' असल्याचे चार जूनला निदान झाले. तेव्हाच, त्यांच्यावर याच हॉस्पिटलमध्ये पुढचे तीन दिवस उपचारही करण्यात आले. मात्र, सात जूनला बाळाचा मृत्यू झाला. ही घटना घडून शनिवारी सात दिवस झाली; तोपर्यंत बाळाचा जीव गेल्याची पुसटशीही कल्पना महापालिकेच्या आरोग्य खात्याला नव्हती. किंबहुना ती आमच्या पोचविण्यात आली नसल्याचे महापालिका आता सांगू लागली आहे. 

शहरातील नवे रुग्ण, कोरोनामुक्त, मृत्यू याचा एकत्रित अहवाल महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून रोजच्या रोज जाहीर केला जातो. त्यात महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांचा तपशील असतो. मात्र, गेल्या सात दिवसांत या बाळाच्या मृत्युची नोंद कुठेच दाखविली गेली नाही. परंतु, शनिवारच्या रिपोर्टमध्ये बाळाचा मृत्यू झाल्याचे नोंदविल्याचे दिसून आले. तेव्हा; त्यावरच्या तारखांवर नजर टाकली असता, हा गोंधळ पुढे आला.

बाळाचा मृत्यू सात जूनला झाला, तर त्याची नोंद आज का दाखविली? हा प्रश्‍न आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी संपर्क साधला; तेव्हा डॉ. हंकारे म्हणाले, "नेमके काय झाले आहे? हे जाणून घेत आहोत. त्यासाठी चौकशी केली जाईल आणि त्याआधी हॉस्पिटलला नोटिस देऊन त्यांच्याकडून खुलासाही मागविण्यात येईल. '' 

मुळात, कोरोना रुग्णांच्या तपासणीपासून, त्यांच्यावरचे उपचार, कोरोनामुक्तांचे आकडे देत, आपल्या कामाचा तपशिल मांडणाऱ्या महापालिकेने खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचाराकडे काणाडोळा केल्याची बाब या घटनेवरून उघडकीस आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात शनिवारी नव्या 254 रुग्णांची भर पडली आहे. तर 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मात्र, मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून, दिवसभरात 14 बळी गेले आहेत. तर विविध रुग्णालयांतील 208 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील 47 रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. सध्या 2 हजार 810 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 87 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com