आफताब शाहाच्या समाजमाध्यमातील खात्याच्या माहितीचे विश्लेषण होणार

एटीएसने काश्मीरमधून अटक केलेल्या आफताब शाह याच्या समाजमाध्यमातील खात्याच्या माहितीचे विश्लेषण होणार.
ats
atssakal
Summary

एटीएसने काश्मीरमधून अटक केलेल्या आफताब शाह याच्या समाजमाध्यमातील खात्याच्या माहितीचे विश्लेषण होणार.

पुणे - ‘लष्कर-ए-तैयबा’ दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काश्मीरमधून अटक केलेल्या आफताब शाह याच्या समाजमाध्यमातील खात्याच्या माहितीचे विश्लेषण केले जात असून, या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती एटीएसने गुरुवारी (ता. १६) न्यायालयास दिली.

शाह याला विशेष न्यायालयाने गुरुवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी लष्कर-ए-तैयबाशी संपर्कात असल्याच्या संशयावरून एटीएसने दापोडी येथून जुनैद महंमद अता महंमद (वय २८, रा. दापोडी, मूळ रा. बुलडाणा) याला गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगिल, गंधारबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली.

त्यामध्ये दोन जून रोजी जुनैदचा साथीदार असल्याच्या संशयावरून आफताब शाहला एटीएसने अटक केली. त्यानंतर एटीएसने या प्रकरणात इनामूल हक ऊर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पाटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) आणि महंमद युसूफ महंमद शाबान अत्तू (वय ३१, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. दोडा, जम्मू-काश्मीर) या दोन संशयित तरुणांनाही अटक केली आहे.

दरम्यान, आफताबच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, साक्षीदारांचा जबाब नोंदविला जात आहे. आफताबच्या समाजमाध्यम खात्याच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे, तसेच अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी आफताबला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी एटीएसतर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात केली. बचाव पक्षातर्फे ॲड. यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com