आरटीईनुसार राखीव जागांची आता संकेतस्थळावर माहिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागा असणाऱ्या सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी आता शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षात आरटीईच्या पोर्टलवरदेखील या यादीची लिंक असेल. शैक्षणिक वर्ष 2019-20पासून ऑनलाइन प्रणालीत हे बदल करण्यात येणार आहेत. 

कायद्यानुसार वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत 2019-20 च्या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा करण्यात यावी, असे आदेश काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याप्रमाणे सरकारने हे बदल करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी असणाऱ्या ऑनलाइन प्रणालीत ही सुधारणा केली जाणार असून, त्याचा फायदा पालकांना होणार आहे. सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी, त्याची लिंक आरटीई पोर्टलवर द्यावी, यासंदर्भात नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर (पुणे) यांनी कार्यवाही करावी, असा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. 

Web Title: information on the reserved seats according to the RTN website