अजित पवार म्हणतात, कोरोनाविरुद्ध लढाई जिंकायचीय तर...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करा
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- कोरोनाविरुद्ध लढाई जिंकायचीय तर मास्क घाला 

पुणे :  कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे. त्यासाठी यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता. 28) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली.

पवार म्हणाले, कोरोनाची साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावी लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी.

... अन् मालकाच्या प्रेमापोटी बैलाने गिळलेले सोने केले परत

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. कोरोना कालावधीत पोलिस अहोरात्र कार्यरत आहेत. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधांबाबत दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

अन् अजित पवारांसमोरच फडणवीस म्हणतात, माझा आवाज...

विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी या वेळी उपस्थित होते. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiate action against violators says ajit pawar