दुधाची रिकामी पिशवी द्या आणि रोपटे घेऊन जा ; उपक्रमाचा सांगवीत शेवट, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

An initiative has been taken to get rid of plastics at Old Sangvi 2.jpg
An initiative has been taken to get rid of plastics at Old Sangvi 2.jpg

जुनी सांगवी (पुणे) : प्लास्टिक बंदीसाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबिवले जात आहेत. यालाच जोड म्हणून तरुणांनी शहरात दुधाची मोकळी पिशवी द्या आणि झाडाचे आवडते रोपे घेऊन जा, असा स्तुत्य उपक्रम राबवला. प्लास्टिक मुक्ती अशी या मागची संकल्पना असून मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाला शहरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच उपक्रमाला पिंपरी चिंचवडसह, सांगवीकरांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. 

सांगवीमध्ये जवळपास तीन ते चार हजार दुधाच्या रिकाम्या पिशव्या जमा झाल्या असून जवळपास २०० विविध झाडांची रोपटे या उपक्रमाद्वारे नागरिकांनी घेतली. या उपक्रमाचा शेवटचा टप्पा सांगवीत झाला. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता आणखी कालावधी वाढवण्याचा आयोजकांचा मानस आहे. इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येकी दुधाच्या मोकळ्या पिशवीला ४० पैसे दर आहे. त्यानुसार, काही दुधाच्या मोकळ्या पिशव्या आणि रोख रक्कम देऊन हवी ती झाडं नागरिकांनी घेतली. यात वेगवगेवळ्या ४० विविध जातीची झाड आहेत. 

वेगवेगळ्या जातीची नेमकी कोणती झाडे मिळतात ?

गोकर्ण पांढरा, निळा, आंबेमोहोर बासमती, गवती चहा, कढीपत्ता, कृष्ण तुळस, पुदिना, गुलाब देशी/ काश्मिरी, रातराणी, मोगरा, निशिंगंध, शेवंती, कापूर तुळस, सब्जा, कोरफड, लसूण, अडूळसा यांच्यासह विविध ४० जातींची झाडं दुधाच्या मोकळ्या पिशवीचा मोबदल्यात नागरिकांना मिळाली. 

आमची ११ एकरात नर्सरी असून जमा केलेल्या दुधाच्या मोकळ्या पिशव्या रोपांसाठी वापरल्या जाणार आहेत. हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राबविला जात असून १९ ठिकाणी दुधाच्या मोकळ्या पिशव्यांचं संकलन केले जात आहे.
- निनाद सोनवणे आणि ज्ञानेश्वर भंडारे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com