कावळ्यांच्या तावडीत सापडली होती जखमी लांडोर...

युनूस तांबोळी
सोमवार, 1 जून 2020

शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील नागरिकांनी सहा महिन्यांच्या जखमी लांडोरीला (मोर) कावळ्यांच्या तावडीतून वाचवून उपचार करत वनविभागाच्या ताब्यात दिले.

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील नागरिकांनी सहा महिन्यांच्या जखमी लांडोरीला (मोर) कावळ्यांच्या तावडीतून वाचवून उपचार करत वनविभागाच्या ताब्यात दिले.

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात
   
शिरूर तालुक्यातील माळवाडी हे टाकळी हाजीमधून नुकतीच नवी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कुकडी नदी व मीना कालव्यामुळे या परिसरात शेती फुललेली पहावयास मिळते. त्यामुळे सगळीकडे हिरवेगाव वातावरण व डाळिंब व ऊस शेती आहे. मात्र, त्यामुळे या परिसरात बिबट्या, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, मोर, लांडोर या बरोबर अनेक पक्षी पहावयास मिळतात. चारा व अन्नामुळे या परिसरात मोरांची संख्या वाढली आहे. शुकवार (ता. 29 मे) वसंत टिळेकर यांनी त्यांच्या शेतात 6 महिन्याच्या लांडोरीला शेतात जखमी अवस्थेत पाहिले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

टिळेकर यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून त्या मोराला कावळ्यापासून वाचविले. तसेच, रमेश टिळेकर, सागर टिळेकर, नीलेश टिळेकर यांच्या मदतीने उचलून घरी आणले. गायींच्या शेडमध्ये कुत्र्यांपासून सुरक्षेसाठी जाळी लावून लांडोरीची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली. पशुवैद्यकीय डॉ. नवनाथ टिळेकर यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात दिले. या लांडोरीची तपासणी करून वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवले असून, नंतर जंगलात सोडून देणार असल्याचे वनविभागाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured Landor was found in the clutches of crows