सामाजिक कार्यकर्ता सिंहगड रस्त्यावर स्वखर्चाने मारतोय पाणी  

निलेश बोरुडे        
बुधवार, 29 जानेवारी 2020

दोन वेळा स्वखर्चाने टँकरने पाणी मारण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक भावनेतून ते हे काम करत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

किरकटवाडी : एक सामाजिक कार्यकर्ता सिंहगड रस्त्यावर दोन वेळा स्वखर्चाने टँकरने पाणी मारत आहे. सामाजिक भावनेतून ते हे काम करत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

कासवगतीने चाललेले सिंहगड रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, वाहनांमुळे उडणारी धूळ या सर्वांमुळे आजूबाजूचे व्यावसायिक, रहिवासी, रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक सर्वच त्रस्त आहेत. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ठेकेदार धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर किमान पाणीसुद्धा मारताना दिसत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकांना थोडासा दिलासा म्हणून सामाजिक जाणिवेतून किरकटवाडी फाट्याजवळ जयप्रकाश नगर येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सैपन गोगी यांनी 26 जानेवारी 2020 पासून नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान दररोज दोन वेळा स्वखर्चाने टँकरने पाणी मारण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक भावनेतून ते हे काम करत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

शिवसेनेमुळे अडले समन्वय समितीचे घोडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innovative initiative on social worker Singhagad street