धक्कादायक! पी.पी.ई किट न परिधान करता केली जाते पुण्यातील या ठिकाणी तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

सावित्रीबाई फुले कोरोना तपासणी केंद्र निलज्योती जनववाडी - गोखलेनगर या ठिकाणी टेक्निशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पी.पी.ई किट न परिधान करता कोरोना तपासणी करत आहेत. तपासणीसमध्ये चाललेल्या हालगर्जीपणामुळे नागरिक व टेक्निशियन दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होत असून, शिवाजीनगर-घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले कोरोना तपासणी केंद्र चालवले जाते.

गोखलेनगर - सावित्रीबाई फुले कोरोना तपासणी केंद्र निलज्योती जनववाडी - गोखलेनगर या ठिकाणी टेक्निशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पी.पी.ई किट न परिधान करता कोरोना तपासणी करत आहेत. तपासणीसमध्ये चाललेल्या हालगर्जीपणामुळे नागरिक व टेक्निशियन दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होत असून, शिवाजीनगर-घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले कोरोना तपासणी केंद्र चालवले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, वैदूवाडी, पांडवनगर, सेनापती बापट रस्ता, पत्रकार नगर या परिसरातील नागरिक कोरोना तपासणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले तपासणी केंद्रात येतात. या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध नसते, तपासणी साठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा समस्या तपासणी केंद्रात दिसून येत आहेत.हालगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'मी स्वतः उमेदवार आहे, असं समजून आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा'; सुप्रिया सुळेंचं आवाहन

'एक -दोन तासांनी पेशंट येतात. पी.पी.ई किट परिधान केले तर बाथरूम ला वगैरे जाता येत नाही. दिवसभर किट घालून बसू शकत नाही. पेशंट कमी आहेत. घामाने त्रास होतो'.
- एकनाथ चव्हाण टेक्नीशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ).

एकूण ११ कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, दोन लिपीक, दोन टेक्नीशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ). चार समुह संघटिका, एक सेविका काम पाहत आहेत. दररोज साधारण  ४० ते ५० लोकांनी तपासणी करण्यात येते. यामध्ये चार ते पाच नागरिक पॉझिटिव्ह असतात. तपासणी वेळ सकाळी १० ते ४:३० पर्यात आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection done at this place in Pune without wearing PPE kit