सकारात्मक भूमिकेतून सहभागी व्हा - पोलिस महानिरीक्षक डॉ. वारके

Suhas-Warake
Suhas-Warake

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात सर्व घटकांनी सकारात्मक भूमिकेतून सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. 

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेत डॉ. वारके यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथे नागरिकांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, पंचायत समिती माजी उपसभापती मोनिका हरगुडे, सुदामराव पवार, सरपंच रमेश सातपुते, माजी सरपंच रामदास सासवडे, जिजामाता बॅंकेचे संचालक पंडित दरेकर, वैभव यादव उपस्थित होते.

वारके म्हणाले, ‘‘परस्पर बंधुत्व तसेच सलोखा वृद्धिंगत करा. पोलिस यंत्रणा सक्षमपणे समाजासोबत असून पोलिसांच्या सूचना पाळून कायदा सुव्यवस्था जपा. आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम शांततेत पार पाडू.’’ 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकारामुळे दाखल गुन्ह्यांमुळे तरुणांमध्ये अद्यापही भीतीच्या सावटामुळे याबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याबाबतच्या स्थानिकांच्या मागणीला उत्तर देताना डॉ. वारके यांनी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया शासनाच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी योग्य पातळीवर पाठपुरावा आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. रांजणगाव देवस्थानचे अध्यक्ष ॲड. विजयराज दरेकर यांनी प्रास्ताविक केले. बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे या वेळी उपस्थित होते.

कायदा सुव्यवस्था चांगली राहिली तरच विकास वेगात होईल. वादग्रस्त बाबींकडे दुर्लक्ष करा. प्रशासनाला सहकार्य करा. येणाऱ्या बांधवांचे चांगले आदरातिथ्य करून सलोखा वाढवा.
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com