सोनवडी सुपेची जलयुक्त शिवार अभियानच्या समितीकडून पाहणी

विजय मोरे 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

उंडवडी (बारामती) - सोनवडी सुपे या गावाला नुकतीच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासकीय समितीकडून जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करुन मुल्यमापनासाठी तपासणी करण्यात आली. या शासकीय समितीमध्ये भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, जलसंधारण विभागाचे उप अभियंता श्री. कसबे यांचा समावेश होता. 

यावेळी बारामती तालुका कृषी अधिकारी दतात्रेय पडवळ, उंडवडी सुपेचे मंडल कृषी अधिकारी पी. एस. जगताप, गावकामगार तलाठी नंदा फुंदे, कृषी सहाय्यक आण्णासाहेब पासले, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, माजी सरपंच सविता मोरे, माजी उपसरपंच सोपान साळुंखे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जनार्धन वाबळे, प्रकाश मोरे, सुरेश मोरे, ताराचंद थोरात आदी उपस्थित होते.

येथे सन  2016/17 मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावाने एकत्रित येवून लोकसहभाग, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, सकाळ रिलीफ, बारामतीतील विविध विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून,  स्पेनटेक्स इंडस्ट्रीज कंपनी तसेच शासकीय निधीतून गावाच्या परिसरात मृद व जलसंधारणाची विविध कामे प्रभावीपणे करण्यात आली आहेत. 

यामध्ये ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, बांधबंधिस्ती, पाझर तलावातील गाळ काढणे, बांधबंधिस्ती, खोल सलग समतल चर, वैयक्तिक शेततळे, विहीर पुनर्भरण, वॉटर रिचार्ज शॅप्ट (ओढ्यात व पाझर तलावात आधुनिक पध्दतीने बोअरवेल्सच्या साह्याने पुनर्भरण योजना) आदी कामांचा समावेश आहे. या कामांची जलयुक्त शिवार अभियानच्या समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन तपासणी केली. 

Web Title: Inspector of Water Supply Shivar Campaign Committee of Sonawadi Supe