छंदामुळे आयुष्याला मिळाली नवसंजीवनी;जयश्री कसेगावकर यांचा प्रेरणादायी प्रवास (Video)

jayshree kasegaonkar
jayshree kasegaonkar

पुणे - माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि छंदप्रियही. छंदामुळे माणसाचे मन रमते आणि रिकामा वेळ सुयोग्य कामात जातो. मला देखील याच छंदामुळे जगण्याची नवी परिभाषा मिळाली आणि 'ल्यूकेमिया' (रक्ताचा कर्करोग) सारख्या आजारातून मी बाहेर पडू शकले. कित्येकांना मी कर्करोग झाल्यावर खचताना पाहिलंय, पण मला माझ्या कुटुंबाची साथ आणि कलात्मक वस्तूंच्या छंदामुळे फक्त सकारात्मक ऊर्जा मिळत गेली.

वयाच्या 69 वर्षी सुद्धा इतक्याच उत्साहाने जयश्री कासेगावकर या मोत्यांचे वस्तू, लोकरीतून लहान बाळांसाठी स्वेटर, मोजे अश्या वस्तू तयार करतात. पती, मुलगा, सून आणि नातू असा त्यांच्या परिवार आहे. तर कुटुंबातील सगळ्यांकडून त्यांच्या या आवडीला जोपासण्यासाठी मिळणारा प्रतिसाद त्यांच्यातील हा उत्साह वाढविण्यास मोठे कारण असल्याचे त्या सांगतात. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कसेगावकर या दक्षिण मुख्यालयाच्या कार्यालयात वरिष्ठ लेखापरीक्षक होत्या आणि 2010 मध्ये त्या निवृत्त झाल्या. पण 2006 हे वर्ष त्यांच्यासाठी यत्नादायी ठरले. त्यांची बदली नगरला झाली होती आणि अचानक त्यांची तब्बेत खराब होत गेली. एकाएकी उलट्या व चक्कर आल्याने त्यांना तातडीने पुण्यात आणले गेले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान यावेळी त्यांना 'ल्यूकेमिया' असल्याचे निदर्शनास आले. आपल्याला कर्करोग आहे असे समजतात कित्येक लोक खचून जातात. परंतु जयश्री यांनी न घाबरता या परिस्थितीचा सामना केला. केमोथेरपी व औषधाच्या परिणामामुळे केस गळाले, छहरा निस्तेज झाला. तरी सुद्धा नोकरीवर रुजू झाल्या. पाठोपाठ पायाचे फ्रॅक्चर, हाडांचा ठिसुळपणा हे आजार सुरूच होते. या नकारात्मक बाबींवर उपाय म्हणून संपूर्ण उपचाराच्या प्रवासात नवनवीन कलात्मक वास्तूं बनवत स्वतःचे मन रमवत गेल्या. सकारात्मक विश्वास आणि स्वतःला चांगल्या कामात गुंतवलं की कोणत्याही आजारावर मात करणे शक्य आहे असे त्या सर्वांना सांगतात. 

लॉकडाऊनच्या काळातही मला या कलात्मक वस्तू बनविताना आनंद मिळत होता. त्यामुळे कोणताही मानसिक ताण मला आला नाही. लोकांनी आयुष्य जगण्यासाठी आपले छंद जोपासणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे फक्त वेळच नाही तर मानसिक ताण सुद्धा कमी करता येतो. असे जयश्री यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"गेली 15 वर्षे ती घरातच जास्तीत जास्त वेळ घालवते. तिच्या कलात्मक वस्तूंशी निघडीत साहित्य बाजारातून आणून देतो. नातेवाईकांमध्ये कोणाचेही लग्न असेल तर रुखवत, मोत्यांचे ताट, तुळशी वृंदावन, प्राणी तसेच लहान मुलांसाठी लोकरीचे कपडे, मोबाईल कव्हर अश्या विविध वस्तू तयार करते. तिची ही जिद्द आणि सकारात्मक विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."
- विजय कसेगावकर, (निवृत्त शिक्षक)- जयश्री यांचे पती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com