शिक्षणाची दूत

Jayashri-Gadage
Jayashri-Gadage

वडील नाथा मेहेर कृषी विभागात शिपाई होते. आई मंजुळाबाई शेतमजूर. मुलींनी खूप शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभे राहावे, ही त्यांची इच्छा माझ्या मनात बालपणापासून घर करून राहिली. गरिबीतही लाड व शिक्षणाच्या खर्चात काटकसर केली नाही. अभ्यासात सामान्य असणारी मी आईवडिलांच्या प्रेरणेमुळे पाचवी ते दहावीत सतत पहिली आले. त्याच शाळेत स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला. मेडिकल क्षेत्र निवडण्याची इच्छा गरिबीमुळे सोडून डीएडला प्रवेश घेतला.

शिक्षिका होऊन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची खूणगाठ बांधली.
२००३ मध्ये वडगाव कांदळी येथे शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. विद्यार्थी गुणवत्तेत चमकून शाळेच्या नावलौकिकास पात्र ठरावे अशा अपेक्षेने उत्तम शिक्षण देताना पालक व ग्रामस्थांची सकारात्मकता दिसून आली. शाळेत बेंच, ग्रीन ग्लास बोर्ड, संगणक कक्ष उभारण्यात सहभाग घेतला. शाळा अग्रेसर म्हणून नावारूपाला आली. दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या. पंचायत समितीकडून सन्मान आणि गावाने दिलेला आदर्श शिक्षक पुरस्कार अधिकच प्रेरणा देऊन गेला. २०११ मध्ये आर्वी केंद्रात बदली झाली.

पूर्वीच्या दूरसंचार निगम भूकेंद्र असलेल्या सद्यःस्थितीत बंद पडलेल्या शाळेत त्या वेळी बारा पटसंख्या होती. परिसरातील मजुरांची मुले शिकत होती. गुणवत्ता व दर्जासाठी मुख्याध्यापिका व मी प्रयत्नशील होते. मला मुख्याध्यापकांचा पदभार मिळाला. विज्ञान प्रदर्शनात माझा तालुक्‍यात द्वितीय क्रमांक आला. रोटरी क्‍लब, लोकवर्गणीतून भौतिक सुविधा तसेच मान्यवरांचे वाढदिवस शाळेत साजरे केल्यामुळे वातावरण आनंददायी होऊन गुणवत्तेमुळे पटसंख्या १२ वरून २०१८ पर्यत ३८ झाली. २०१८ मध्ये आंबेगाव तालुक्‍यातील तिरपाड येथे ८५ किलोमीटर अंतरावरील आदिवासी शाळेत बदली झाली. पुन्हा एकदा संकट उभे राहिले. रडायचे नाही लढायचे हे मनाशी ठरवून प्रतिकूलतेवर मात करत मुख्याध्यापक म्हणून काम सुरू केले. मुलांना उपक्रमांच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी साने गुरुजी कथामाला, बालसभा, इमारत दुरुस्ती यांसारखे उपक्रम सहकारी शिक्षकांच्या साथीने, पती संतोष गडगे यांच्या सहकार्याने राबवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com