बेटा और बेटी समझदार बनाओ

डॉ. मधुरा हर्षद शेटे
गुरुवार, 14 मार्च 2019

सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं.

सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं.

मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची सोनोग्राफी तपासणी केली. माझं लक्ष तिच्या लहान मुलीकडे गेलं. मी म्हटलं, ‘मुलीला अभ्यासाची फार आवड दिसते.’ आई म्हणाली, ‘कसला अभ्यास आणि कसली शाळा... तिला तिच्या लहान दोन जुळ्या बहिणी सांभाळायला लागतात. मग समजलं, त्या मुलीला तिच्या दोन जुळ्या बहिणींची काळजी घ्यावी लागत होती.

मुलाच्या आशेवर आई पुन्हा गरोदर होती. मुलगा नाही झाला म्हणून सासू-सासरे मुलींना सांभाळत नव्हते. हे पाहून रडावं की हसावं हे समजत नव्हतं. हा प्रसंग कायमचा लक्षात राहिला.

सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिला मुलगाच हवा म्हणून हट्ट धरतात. फॉर्म भरताना ही सर्व माहिती भरली जाते. खेड्यात अजूनही मुलगा झाला नाही म्हणून स्त्रीजीवन व्यर्थ समजलं जातं. मी स्वतःला भाग्यशाली समजते. मी मुलगी आहे हे कमीपणाचं असतं असा तिळभरही समज माझ्या आई-वडिलांनी केला नाही. माझा जन्म कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर कऱ्हाड शहरातील नीलकंठ शि. एरम व सौ. सुधा एरम यांच्या घरी झाला. माझी मोठी बहीण सौ. शिल्पा विवेक कारले सध्या एजाक्‍स कॅनडा येथे आहे.

बालपण व शालेय शिक्षण कन्याशाळा कऱ्हाड येथे झालं. अकरावी, बारावी श्री. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज येथे झालं. बारावीत चांगले गुण मिळाले. एरम घराण्याला वैद्यकीय वारसा आहे. मोठे काका डॉ. द. शि. एरम व छोटे काका डॉ. सुभाष एरम हे प्रसिद्ध शल्य चिकित्सक आहेत. त्यांचं वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कऱ्हाड शहर व परिसरात मोलाचं योगदान आहे.

घराण्याचा वैद्यकीय वारसा मी पुढे चालवला. MBBS च्या शिक्षणासाठी डॉ. वैशंपायन मेमोरिअल मेडिकल कॉलेज सोलापूर येथे प्रवेश घेतला. त्यानंतर डिप्लोमा इन हाॅस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, हैदराबाद येथे पूर्ण केलं. २००६ मध्ये डॉ. हर्षद शेटे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मंचर येथे स्थायिक झाले. माझ्यातील क्षमता जाणून पती, सासूबाई आणि सासरे यांनी पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. Post Graduation in Radiology पूर्ण केलं. सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले.

कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. २०१२ मध्ये सोनोग्राफीतज्ज्ञ म्हणून व्यवसायास सुरवात केली. मला प्रकर्षाने जाणवला तो शहरी व ग्रामीण स्त्रियांमधला फरक. स्त्री-पुरुष समानतेचं दर्शन बऱ्याच अंशी शहरांमध्ये घडतं. परंतु ग्रामीण स्त्री मात्र अजूनही बुरसटलेल्या विचारांमध्ये गुरफटलेली आहे. मुलगाच हवा हा हट्ट जास्त जाणवतो.

पाच-सहा मुली आहेत म्हणून पुन्हा गरोदर राहणाऱ्या स्त्रिया पाहण्यात येतात. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे योग्य आहेच; पण ‘बेटा और बेटी समझदार बनाओ’ याला महत्त्व द्यावं. स्त्री कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच आर्थिक जबाबदाऱ्या उचलू शकते; तसेच जिच्यामध्ये कुटुंबाच्या योग्य-अयोग्यतेचा निर्णय घेण्याची क्षमता असते, ती स्त्री खऱ्या अर्थानं स्वावलंबी समजावी. शिक्षणाचा उपयोग फक्त पदवी मिळवण्यासाठी होण्यापेक्षा स्वतंत्र विचारक्षमता विकसित होणं जास्त महत्त्वाचं आहे. या सर्व नकारार्थी बाबींमध्ये काही सकारात्मक गोष्टीही आहेत. जशा की महिला बचत गट याद्वारे महिलांना आर्थिक आधार लाभला आहे. त्याबरोबर रोजगाराची हमी उपलब्ध झाली आहे. सामूहिक विवाह पद्धतीमुळे लेकीचं ओझं कमी झालं आहे. शासकीय रुग्णालयातही बालमाता संगोपन याद्वारे चांगले उपक्रम राबवले जातात. इनरव्हीलसारख्या काही सामाजिक संस्थादेखील महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेत आहेत.

घे उंच भरारी, घे नवी उभारी 
दाही दिशा पसरू दे तुझी यशोकीर्ती 
सर्वगुण संपन्न तू तूच नवी शक्ती 
दाखवून दे तू जगाला तुझी खरी शक्ती

Web Title: Inspirational story of Madhura Shete on the occasion of womens day